हुसैनीवाला सीमेवर भारतीय नागरिकाने पाकिस्तानी महिलांप्रति अश्लील हावभाव केल्याने लोक संतप्त झाले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )  
VIRAL

Viral Video: आंतरराष्ट्रीय सीमेवर देशाची मान खाली घालवणारी घटना; हुसैनीवालातील भारतीय तरुणाच्या 'या' व्हायरल व्हिडिओने लोक संतप्त

India Pakistan Border Ceremony Controversy: सोशल मीडिया वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय सीमेसारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारच्या बेशिस्त वर्तनामुळे भारताच्या प्रतिमेला धक्का पोहोचतो. वापरकर्त्यांनी बीएसएफ आणि स्थानिक प्रशासनाने अशा उपद्रवी लोकांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

हर्षदा पाटोळे
  • हुसैनीवाला सीमेवर असभ्य कृत्य

  • सोशल मीडियावर संतापाची लाट

  • बीएसएफच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात असलेल्या ऐतिहासिक हुसैनीवाला भारत-पाकिस्तान सीमेवर (India-Pakistan Conflict) एक अत्यंत लज्जास्पद आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. रोजच्या नियमानुसार आयोजित केल्या जाणाऱ्या 'बीटिंग रिट्रीट' (Beating Retreat Ceremony) समारंभादरम्यान एका भारतीय तरुणाने सीमेपलीकडे बसलेल्या पाकिस्तानी महिला प्रेक्षकांकडे पाहून असभ्य आणि अश्लील हावभाव केले. या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. आंतरराष्ट्रीय सीमेसारख्या अत्यंत संवेदनशील आणि प्रतिष्ठित ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, भारतीय प्रेक्षक गॅलरीत बसलेला हा तरुण सीमेपलीकडील पाकिस्तानी गॅलरीतील महिलांकडे लक्ष करून अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील हावभाव करत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय व लष्करी तणाव वेगळा असला, तरी आंतरराष्ट्रीय सीमेवर देश-विदेशातील पर्यटक आणि नागरिक संस्कृती आणि देशाचा अभिमान अनुभवण्यासाठी एकत्र येतात. अशा ठिकाणी एका तरुणाच्या या हलक्या आणि उथळ वर्तनामुळे भारताच्या सुसंस्कृत आणि आदरातिथ्यशील प्रतिमेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा धक्का पोहोचल्याची भावना व्यक्त होत आहे.

नेटकऱ्यांचा संताप अन् बीएसएफच्या व्यवस्थापनावर सवाल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर युजर्सनी आरोपी तरुणाविरोधात कडक कारवाईची मागणी लावून धरली आहे. मुद्दा हा दोन देशांमधील राजकीय संबंधांचा नसून मानवी सभ्यता आणि महिलांचा सन्मान करण्याचा आहे. भारतीय संस्कृतीने नेहमीच स्त्रियांचा आदर करण्याची शिकवण दिली आहे—मग त्या महिला स्वदेशी असोत वा परदेशी. शत्रू देशातील नागरिकांशीही सीमेवर संयमाने आणि सन्मानाने वागणे ही भारताची ऐतिहासिक परंपरा राहिली आहे. अशा स्थितीत या तरुणाचे कृत्य संपूर्ण देशाची मान खाली घालवणारे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

या घटनेनंतर सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षा यंत्रणेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्येष्ठ पत्रकार मन अमन सिंग छिना यांनी सोशल मीडियावर यावर तीव्र आक्षेप नोंदवत बीएसएफ पंजाबला थेट सवाल केला की, "अशा संवेदनशील आणि गजबजलेल्या ठिकाणी असा प्रकार कसा घडू शकतो? सुरक्षा दल गर्दीवर योग्य प्रकारे लक्ष का ठेवत नाही?" त्यांनी हे कृत्य अत्यंत लज्जास्पद असल्याचे सांगत अशा बेशिस्त उपद्रवी घटकांना तात्काळ समारंभ स्थळावरून बाहेर काढायला हवे होते, असे मत व्यक्त केले. इतर युजर्सनीही व्हिडिओच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

भारताच्या प्रतिमेला तडा; कठोर कारवाईची मागणी

हुसैनीवाला आणि वाघा बॉर्डर हे ठिकाण केवळ लष्करी परेडसाठी प्रसिद्ध नसून ते दोन देशांतील सीमा सुरक्षेचे आणि शिस्तीचे प्रतीक मानले जाते. दररोज हजारो नागरिक ही बीटिंग रिट्रीट परेड पाहण्यासाठी येतात. अशा ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडल्यास त्यातून चुकीचा संदेश जातो. भारतीय नागरिकांनी नेहमीच आपल्या आचरणातून देशाची उच्च मूल्ये आणि संस्कृती जपली पाहिजे.

प्रशासनाने आणि बीएसएफने या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित तरुणाचा शोध घ्यावा आणि सीमेसारख्या संवेदनशील ठिकाणी बेशिस्त वर्तन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर पावले उचलावीत, अशी एकमुख मागणी आता जोर धरत आहे. यामुळे भविष्यात अशा घटनांना आळा बसेल आणि सीमेवरील शिस्त व सन्मान कायम राहील.

Honda Alpha electric SUV: होंडा अल्फा इलेक्ट्रिक SUV च्या डिझाइनचा खुलासा; 2 डिसेंबरला होणार जागतिक पदार्पण!

कानातले Earbuds आता तुमचे बोलणे लिहून देणार! AI चे भन्नाट फीचर

IND A vs SL A: फायनलसाठी आरपारची लढाई! श्रीलंकेचा विजयरथ रोखण्यासाठी भारत सज्ज; सेमीफायनलचा थरार कधी अन् कुठे?

Family: कुटुंबापासून दूर राहताय? नात्यांमध्ये वाढतोय दुरावा? कुटुंबाशी जवळीक टिकवण्यासाठी फॉलो करा 'या' खास टिप्स!

Rahul Gandhi Instagram Story: राहुल गांधींनी शेअर केला रितेश आणि जेनेलिया देशमुख यांचा 'तो' व्हायरल फोटो; सोशल मीडियावर खळबळ