कंटेंट क्रिएटरने मुलाखत शेअर केली
भारतातील 100 गावांना भेट देणार
सोशल मिडिया युझर्सच्या प्रतिक्रिया
viral Instagram interview : एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओ मध्ये शेन नावाचा एक 29 वर्षीय आयरिश तरुण, त्याने आपली 9 ते 5 या वेळातली नोकरी सोडली आणि सायकलवरून जगभर प्रवास करतोय. आता तो भारतात आहे आणि पुढील तीन महिन्यांत 100 गावांना भेट देण्याच्या आव्हान त्यांने घेतले आहेत.
त्याचा दिल्ली ते दक्षिण भारत असा सायकल प्रवास करत तो गावातील जीवन, खाद्यपदार्थ, संस्कृती आणि खऱ्याखुऱ्या कथा चित्रित करणार आहे. त्यानंतर, श्रीलंकेला जाण्याची त्याची योजना आहे. यात शेनने स्वतः म्हटले आहे की, आतापर्यंतच्या त्याच्या प्रवासातील हे सर्वात मोठे आव्हान आहे.
सोशल मिडिया कंटेंट क्रिएटरने म्हटले आहे की, शेनचा प्रवास खूपच अनोखा आहे. त्याने आयर्लंडमध्ये एक सायकल विकत घेतली आणि तंबूतच आपले घर बांधले. तो नेहमी आपल्यासोबत कॅमेरा आणि ड्रोन बाळगतो, ज्याचा वापर करून तो आपले प्रवासाचे अनुभव सोशल मीडियावर शेअर करतो. त्याने नुकताच अफगाणिस्तानचा दौरा पूर्ण करून तो भारतात परतला. दिल्लीत तो कंटेंट क्रिएटर शशांक शर्माला भेटला. शशांकने त्याची मुलाखत इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यानंतर शेनची ही स्टोरी व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओमध्ये शेन म्हणतोय, "मला खरंच भारतात यायचं होतं, आणि मला एक वर्षाचा व्हिसा मिळाला आहे, त्यामुळे मी इथे तीन महिने घालवणार आहे." त्याने पुढे सांगितले की भारत किती विशाल आहे. हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. "हा एक लांबचा प्रवास असणार आहे. हे माझ्यासाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे आव्हान आहे. मी फिरण्यासाठी आणि माझे अनुभव शेअर करण्यासाठी खूप उत्सुक आहे."
शेनचे ध्येय केवळ प्रवास करणे नाही. तो गावांमध्ये थांबून स्थानिकांना भेटणार असून त्या-त्या शहरातल्या जेवणाची चव घेणार आहे. तसेच त्यांच्या दैनंदिन जीवनाची अधिक जवळून माहिती घेईल. सायकल आणि तंबू घेऊन एकट्याने प्रवास करणे सोपे नाही, पण त्याने आपले आरामदायक ऑफिसचे आयुष्य सोडण्याचा निर्णय घेतला. शशांकने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "हा आयरिश माणूस भारतातील 100 गावांमधून सायकल चालवत आहे. ही एकट्याने प्रवास करणाऱ्यांसाठी एक प्रेरणा आहे." त्याने लोकांना आवाहन केले की जर त्यांना शेन कुठेही सापडला तर त्यांनी त्याला मदत करावी.
सोशल मीडिया वापरकर्त्यांनी शेनच्या धैर्याचे कौतुक केले. अनेकांनी सांगितले की नोकरी सोडून असे मोठे आव्हान स्वीकारणे सोपे नाही. काहींनी भारतीय गावांच्या सौंदर्याची आणि पाहुणचाराची प्रशंसा करत त्याला शुभेच्छा दिल्या. शेनच्या या मोहिमेने अनेक तरुणांना एकट्याने प्रवास करण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा दिली आहे.
जेव्हा एका सोशल मीडिया वापरकर्त्याने त्याला विचारले की त्याला कोणते भारतीय शहर सर्वात रोमांचक वाटले, तेव्हा शेनने उत्तर दिले, "आतापर्यंत मी फक्त दिल्लीला गेलो आहे. मला वाटते की गोवा देखील खूप मनोरंजक असेल; ताजमहल हे माझे पहिले ठिकाण असेल आणि त्यानंतर मी श्रीलंकेतील माझ्या बहिणीला भेटायला जाईन."
दरम्यान, दुसऱ्या एका व्यक्तीने म्हटले, "अप्रतिम, असेच चालू ठेव. तुला भेटून आणि तुझ्या प्रवासांबद्दल जाणून आनंद झाला. असेच चालू ठेव."
एका व्यक्तीने टिप्पणी केली, "शेन सहजतेने हा विलक्षण लूक तयार करत आहे. तो काहीतरी वेगळाच आहे!"
विशेष म्हणजे, यापूर्वी एका ऑस्ट्रेलियन पर्यटकाने भारतात ऑटो-रिक्षा चालवल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.