Vrindavan Viral Video फोटो सौजन्य सोशल मिडिया  Vrindavan Viral Video फोटो सौजन्य सोशल मिडिया
VIRAL

Vrindavan Viral Video : वृंदावनमध्ये ई-रिक्षाच्या भाड्यावरून राडा; महिलेला क्रूर मारहाण

-वृंदावनमधील प्रसिद्ध प्रेम मंदिराजवळ ई-रिक्षाच्या भाड्यावरून झालेल्या वादातून एका महिलेला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिलेच्या मुलाने ई-रिक्षाचालक आणि त्याच्या पत्नीवर मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

sanman jadhav
  • ई-रिक्षा चालकाने प्रवासासाठी 150 रुपये भाडे मागितले

  • आपल्या आईला अत्यंत क्रूरपणे मारहाण केल्याचा आरोप

  • सोशल मीडियावर नागरिकांकडून संताप

Vrindavan Viral Video : वृंदावनमधील प्रसिद्ध 'प्रेम मंदिर' जवळील रस्त्यावरचा व्हिडिओ व्हायरल एका महिलेला अत्यंत क्रूरपणे मारहाण केल्याचा बातमी समोर येतेय. या घटनेच्या दृष्यायांमध्ये असे दिसून येते आहे की, दोन्ही बाजूंनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारत आहेत. पीडित महिलेच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार ई-रिक्षाच्या भाड्यावरून झालेल्या वादातून ही घटना घडली असल्याचे सांगितले जाते. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

ई-रिक्षा चालकाने प्रवासासाठी 150 रुपये भाडे मागितले

पीडित महिलेच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार ई-रिक्षा चालकाने प्रवासासाठी 150 रुपये भाडे मागितले, यावर मुलाने आक्षेप घेतला व रिक्षा चालकाला सांगितले 'पुढे गेल्यावर 10 रुपयांतही रिक्षा मिळते' असे मुलाने सांगितले. या घटनेनंतर भाड्यावरून शाब्दीक बाचाबाची झाली. तर या घटनेचे रूपांतर काही वेळाने हाणामारीत झाले. या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन्ही बाजूंचे लोक भररस्त्यात एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करतानाही दिसत आहेत.

आपल्या आईला अत्यंत क्रूरपणे मारहाण केल्याचा आरोप

ई-रिक्षा चालक आणि त्याच्या पत्नीने मिळून आपल्याला आणि आपल्या आईला अत्यंत क्रूरपणे मारहाण केल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे. या हल्ल्यात महिला अत्यंत जखमी झाली आहे.

सोशल मीडियावर नागरिकांकडून संताप

धार्मिक स्थळी अशा प्रकारे भररस्त्यात झालेल्या या हिंसक घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असून, स्थानिक प्रशासनाने याप्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Amey Wagh: अमेय वाघचा लोकप्रिय डायलॉग आता गाण्याच्या रूपात! जळगावात रंगला खास लोकार्पण सोहळा

Dilip Vengsarkar : 'आपलं ताडोबा' प्रदर्शनाला दिलीप वेंगसरकर यांची भेट; छायाचित्रकार मोहन बने यांच्या मेहनतीचं केलं कौतुक

Satara News: माण तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गडद! राजेवाडी तलावातून अहोरात्र पाणी उपसा सुरू

World News : POEC संघटनेला अमेरिकेचा मोठा धक्का; व्हेनेझुएला आणि इराकला बाहेर पडण्यासाठी ट्रम्प प्रशासनाचा दबाव

शेतकऱ्यांच्या फळबागांची कराडच्या कृषी प्रदर्शनात चमक; कोणत्या फळाला मिळाला पहिला क्रमांक?