Yellanki Polytechnic College Viral Video फोटो सौजन्य सोशल मिडियी  Yellanki Polytechnic College Viral Video फोटो सौजन्य सोशल मिडियी
VIRAL

Yellanki Polytechnic College Viral Video: WhatsApp चॅटचे स्क्रीनशॉट पाहताच विद्यार्थ्यांचा संताप अनावर; प्राध्यापकाला बेदम मारहाण

तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील अमीनपूर परिसरातील पटेलगुडा येथील येल्लंकी पॉलिटेक्निक कॉलेजमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवून तिच्याशी चॅटिंग करण्याचा आग्रह धरल्याचा आरोप, या मेसेजचे स्क्रीनशॉट पाहिल्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी प्राध्यापकाला मारहाण केल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहे.

sanman jadhav
  • अश्लील संदेश पाठवल्याचा आणि दररोज त्याच्याशी चॅटिंग करण्याचा आग्रह

  • शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील विश्वासाच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित

  • प्राध्यापक रवी याच्यावर 'पोक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Yellanki Polytechnic College Viral Video : सोशल मिडियावर तेलंगणाराज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातील अमीनपूर परिसरातील पटेलगुडा येथील " येल्लंकी पॉलिटेक्निक कॉलेजचा " एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.या व्हिडिओ मधील कॅालेजचे विद्यार्थी एका प्राध्यापकाला मारहाण करताना दिसत आहेत. त्याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायर होत आहे. एका विद्यार्थिनीला अश्लील मॅसेज पाठवल्याचा प्रकारणी मारहाण करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

अश्लील संदेश पाठवल्याचा आणि दररोज त्याच्याशी चॅटिंग करण्याचा आग्रह

मिळालेल्या माहिती नुसार या व्हिडिओ मध्ये काही विद्यार्थी हे आपल्या कॅालेजच्यासरांना बेदम मारहान करत आहेत. कारण या प्राध्यापकाने डिप्लोमाच्या प्रथम वर्षातील एका विद्यार्थिनीला अश्लील संदेश पाठवल्याचा आणि दररोज त्याच्याशी चॅटिंग करण्याचा आग्रह धरून तिला रोज त्रास दिल्याचा आरोप करण्यात येतोय.

या घटनेशी संबंधित प्राध्यापकाने यापूर्वीही इतर विद्यार्थिनींशी अशाच प्रकारे गैरवर्तन केले असल्याचे म्हटले जाते. घडलेल्या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. विद्यार्थिनीला प्रत्यक्षात कोणत्या प्रकारचा त्रास देण्यात आला आणि या प्रकरणात आणखी काही बाबी समोर येतात का, याचाही तपास सुरू आहे.

शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील विश्वासाच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित

घडलेल्या घटनेमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील विश्वासाच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महाविद्यालय प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, कोणत्याही आरोपाची अंतिम सत्यता तपासातूनच स्पष्ट होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनी मारहाण करण्याऐवजी कायदेशीर मार्गाचा अवलंब करणेही आवश्यक आहे.

प्राध्यापक रवी याच्यावर 'पोक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

या व्हॉट्सॲपवरील मॅसेजचे सारे स्क्रीनशॉट्स पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच अमीनपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्राध्यापक रवी याच्यावर 'पोक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर संबंधीत प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

हिवाळ्यात घरातील हवा कोरडी होते? हे गॅझेट ठरेल उपयोगी!

आरशात पाहताच मिळणार मेकअपचा सल्ला; काय आहे AI Mirror?

झोपताना डोळ्यांवर लावतात हा स्मार्ट मास्क; काय आहेत फायदे?

Sharad Pawar Retirement : पवारांच्या निवृत्तीच्या बातमीवर सुप्रिया सुळे भडकल्या, राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात

Sharad Pawar Retirement: 12 डिसेंबरला शरद पवार निवृत्त होणार? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया अन् चर्चेला उधाण