Iran fighter jet crash : इराण आणि अमेरिका यांच्यातील संबंध हे जागतिक राजकारणातील सर्वात गुंतागुंतीच्या आणि तणावपूर्ण विषयांपैकी एक आहेत. या दोन्ही देशातील वाढत्या लष्करी तणावादरम्यान इराणला मोठा झटका बसला आहे. पश्चिम इराणमधील हमादान येथे प्रशिक्षणादरम्यान इराणचं एक लढाऊ विमान कोसळलं आणि त्या0त वैमानिकाचा मृत्यू झाला. इराणच्या सरकारी माध्यमांशी संबंधित जोडल्या गेलेल्या प्रेस टीव्हीने या अपघाताची पुष्टी केली आहे. हा अपघात अशावेळी झाला आहे जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला हल्ल्याची धमकी दिली होती.
अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प प्रशासन इराणवर 'मर्यादित लष्करी हल्ला' करण्याचा विचार होता. 'द वॉल स्ट्रीट जर्नल'च्या मते, ही कारवाई इराणला नवीन आण्विक करारासाठी भाग पाडण्याच्या उद्देशाने असू शकते. सुरुवातीचे हल्ले हे मर्यादित लष्करी किंवा सरकारी लक्ष्यांवर केले जाऊ शकतात असं सांगण्यात आलं होतं.
ट्रम्प यांनी अलीकडेच 'आम्ही करार करु आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे करार करुच', असं विधान करुन पुढील 10 ते 15 दिवसांमध्ये चित्र स्पष्ट असेल असे संकेत दिले होते. 'द वॉशिंग्टन पोस्ट'च्या वृत्तानुसार, पेंटागॉन मध्य पूर्वमध्ये मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात केलं जात आहे. USS गेराल्ड R. फोर्ड ही विमानवाहू युद्धनौका तैनात करण्यात आली आहे. मार्चच्या मध्यापर्यंत अमेरिकन लष्करी जमाव पूर्णपणे तयार राहणार असल्याची अपेक्षा आहे.
इराणने संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांना पत्र लिहून इशारा दिला. जर त्यांच्यावर लष्करी हल्ला झाला तर या प्रदेशात असलेल्या शत्रू तळांना कायदेशीर लक्ष्य मानतील. इराणचं म्हणणं आहे की कोणताही देश अण्वस्त्र संवर्धनाचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही. इराणने हे पुन्हा स्पष्ट केलं की त्यांना अण्वस्त्रांचा नको आहे पम नागरी उद्देशांसाठी युरेनियम समृद्ध करणं हा त्यांचा अधिकार आहे.
दोन्ही देशांमध्ये अलीकडेच जिनेव्हामध्ये चर्चा झाली. तरिही व्हाइट हाउसच यावर हे म्हणणं आहे की अजूनही बऱ्याच मुद्द्यांवर दोन्ही पक्षांमध्ये अजूनही एकमत नाही. 2015 च्या न्यूक्लियर करारातून अमेरिकेने माघार घेतल्यापासून दोन्ही देशांमधील तणाव सातत्याने वाढतच आहे. त्यामुळे आता हा प्रश्न आहे की ही परिस्थिती हाताळता येईल? की हे मोठे देश आणखी एका लष्करी संघर्षाकडे वाटचाल करतील.