कल्याण : मुंबईत (Mumbai) कोविड घोटाळा झाला (Covid Scam) आहेच त्याबरोबर ठाणे (Thane), कल्याण डोंबिवली (KDMC),उल्हासनगर (Ulhasnagar), अंबरनाथ (Ambarnath) पालिकांमध्ये झालेल्या कोविड घोटाळा झाल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केलाय (MNS MLA Raju Patil made the allegation). त्यावेळी शिवसेना (Shivsena) एकच होती. बी एम सी प्रमाणे ठाणे, कल्याण डोंबिवली,उल्हासनगर, अंबरनाथ पालिकांमध्ये झालेल्या कोविड घोटाळ्याची चौकशी व्हायलाच हवी असे ट्विट करत मनसे आमदार राजू पाटील यांनी मागणी (Demand) केली आहे.
मुंबई महानगरपालिकेत कोविड घोटाळा झालाच आहे पण त्याच बरोबर ठाणे, कल्याण-डोंबिवली,उल्हासनगर,अंबरनाथ या पालिकांमध्ये पण प्रचंड प्रमाणात कोविड घोटाळा झाला आहे.
आत्ताचे सेनेचे दोन गट असले तरी ‘त्यावेळी’ एकच शिवसेना होती.यांनी फक्त पालिका वाटून घेतल्या होत्या.हे सर्व एकाच माळेचे मणी… https://t.co/pnvStDVvhv
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) July 1, 2023
मुंबई महापालिकेत झालेल्या कोविड घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ महापालिकांमध्ये देखील कोविड घोटाळा झाल्याचा आरोप केलाय. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट केलंय. या ट्विटमध्ये राजू पाटील यांनी मुंबई महानगरपालिकेत कोविड घोटाळा झालाच आहे पण त्याचबरोबर ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या पालिकांमध्ये पण प्रचंड प्रमाणात कोविड घोटाळा झाला आहे.
[read_also content=”अवघ्या 30 लोकांचा देश, येथे कुत्र्यांनाही मिळतेय नागरिकत्व https://www.navarashtra.com/web-stories/even-dogs-are-given-citizenship-where-country-of-30-people-nrvb/”]
आत्ताचे सेनेचे दोन गट असले तरी ‘त्यावेळी एकच शिवसेना होती. यांनी फक्त पालिका वाटून घेतल्या होत्या. हे सर्व एकाच माळेचे मणी आहेत कारण या सर्व पालिकांमध्ये यांचीच सत्ता किंवा प्रशासक होते. मुंबई महानगरपालिकेतील कोविड घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे पण त्याच बरोबर ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या पालिकांमध्ये झालेल्या कोविड घोटाळ्याची चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी केली आहे.