फोटो सौजन्य: iStock
महाराष्ट्रासह देशभरात उष्णतेच्या लाटा पाहायला मिळत आहे. याच उन्हाळ्याच्या दिवसात आपण स्वतःची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. याच काळात अनेक ऑटो कंपन्या आपल्या कार्सवर भरघोस डिस्काउंट देत असतात. पण उन्हात कार चालवताना अनेकदा घामाच्या धारा वाहत असतात. यामुळेच तर कारमध्ये AC दिला असतो. पण याव्यतिरिक्त कारमध्ये अन्य फीचर्स सुद्धा दिले जातात. त्यातीलच एक फिचर म्हणजे वेंटिलेटेड सीट.
कारमध्ये उपलब्ध असलेले व्हेंटिलेटेड सीट फीचर भारतीय मार्केटमध्ये खूप लोकप्रिय झाले आहे. उन्हाळ्यात कार चालवताना हे फिचर तुम्हाला थंड ठेवतेच, पण थंड हवामानातही उबदारपणाही देते. या फिचरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे लांब प्रवासात तुम्हाला थकवा येत नाही. हे लक्षात घेऊनच, आज आपण व्हेंटिलेटेड सीट हा फीचर असलेल्या 5 सर्वात स्वस्त कारबद्दल जाणून घेणार आहोत.
Maruti Baleno च्या CNG व्हेरियंटवर दोन लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यास किती असेल EMI?
टाटा मोटर्सने देशात अनेक उत्तम कार्स लाँच केल्या आहे. यातीलच एक उत्तम कार म्हणजे टाटा पंच. या कारच्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये व्हेंटिलेटेड सीट फीचर दिला गेला आहे, ज्यामुळे ही सर्वात किफायतशीर एसयूव्ही आणि हे फीचर देणारी भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार बनते.
ही कार दोन बॅटरी पॅक पर्यायांसह ऑफर केली जाते. यात 25 किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक 265 किमी आणि 35 किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक 365 किमी पर्यंतची रेंज देतो. त्याच्या एम्पॉवर्ड+ ट्रिममध्ये हवेशीर सीट्स आहेत. या कारची किंमत 12.84 लाख ते 14.44 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
ही कार पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी व्हेरियंटच्या पर्यायांसह उपलब्ध आहे. त्याचे पेट्रोल इंजिन 120 एचपी, डिझेल इंजिन 115 एचपी आणि सीएनजी इंजिन 100 एचपीची पॉवर जनरेट करते. त्याच्या टॉप-स्पेक फियरलेस + PS मॉडेलमध्ये हवेशीर फ्रंट सीट्स आहेत. त्याची एक्स-शोरूम किंमत 13.30 लाख ते 15.60 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
Kawasaki Ninja 650 चा स्पेशल एडिशन लाँच, मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स
ही कार नुकतीच भारतीय मार्केटमध्ये लाँच करण्यात आली आहे. किया सायरोसमध्ये पुढील आणि मागील दोन्ही बाजूंनी व्हेंटिलेशन सीट फीचर दिला आहे. HTX आणि HTX+ ट्रिम्समध्ये व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत 13.30 लाख रुपयांपासून सुरू होते. HTX+ (O) व्हेरियंट मागील सीट व्हेंटिलेशन उपलब्ध आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 17.80 लाख रुपये आहे.
किया या कारच्या टॉप-स्पेक GTX+ आणि X-लाइन मॉडेल्समध्ये कुल्ड फ्रंट सीट्स ऑफर करते. या कारची एक्स-शोरूम किंमत 14.80 लाख रुपयांपासून सुरू होते आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायाने सुसज्ज असलेल्या डिझेल मॉडेलसाठी 15.60 लाख रुपयांपर्यंत जाते.
ही कार सामान्य पेट्रोल इंजिन आणि टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन ऑप्शन्ससह ऑफर केली जाते. त्याच्या SX(O) ट्रिममध्ये फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स आहेत, ज्याची किंमत इंजिन पर्यायावर अवलंबून 14.83 लाख ते 17.55 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.