फोटो सौजन्य: iStock
भारतीय मिडसाइज SUV सेगमेंटमध्ये आजपर्यंत Hyundai Creta चे एकतर्फी वर्चस्व गाजवले आहे. सतत मिळालेल्या अपडेट्स आणि जनरेशन अपग्रेड्समुळे कंपनीची ही SUV देशातील सर्वाधिक लोकप्रिय SUV बनवण्यात यश मिळवले आहे. मात्र आता या कारचे टेन्शन वाढले आहे. कारण पुढील काही महिन्यांत अनेक दिग्गज ऑटो ब्रँड्स त्यांच्या नव्या आणि आधुनिक SUV बाजारात आणणार आहेत.
Tata, Maruti Suzuki, Renault, Kia, Nissan, Skoda आणि Volkswagen यांसारख्या कंपन्या या सेगमेंटमध्ये नवीन मॉडेल्स सादर करतील. या SUV मध्ये प्रीमियम डिझाइन, हाय-टेक फीचर्ससोबत इलेक्ट्रिक आणि हायब्रिड पॉवरट्रेनचे पर्यायही उपलब्ध असतील.
Royal Enfield Bullet 650 की Classic 650? कोणती बाईक तुमच्यासाठी आहे परफेक्ट?
Tata Motors त्यांच्या क्लासिक Sierra SUV चे इलेक्ट्रिक अवतार 27 नोव्हेंबर 2025 ला लाँच करणार आहे. नवीन Sierra EV ही कंपनीच्या Born Electric Platform वर आधारित असून, 500 किमीपेक्षा जास्त रेंज, ADAS Level-2 सुरक्षा सुविधा आणि पॅनोरमिक सनरूफ असे फीचर्स मिळतील. याचे फ्यूचरिस्टिक डिझाइन आणि लक्झरी इंटीरियर क्रेटासाठी मोठे आव्हान ठरू शकते.
Renault आपली तिसरी जनरेशन Duster 26 जानेवारी 2026 ला सादर करेल. ही SUV पूर्वीपेक्षा मोठी, दमदार आणि अधिक आधुनिक टेक्नॉलॉजीसह येणार आहे. यात हायब्रिड इंजिन, ऑल-व्हील ड्राइव्ह, आणि 360° कॅमेरा असे फीचर्स दिले जातील.
Maruti Suzuki आपली पहिली इलेक्ट्रिक SUV eVitara डिसेंबर 2025 मध्ये लाँच करणार आहे. यात 400 किमी आणि 500 किमी रेंजचे दोन बॅटरी पॅक ऑप्शन मिळतील. Toyota सोबत विकसित करण्यात आलेल्या या SUV मध्ये फास्ट चार्जिंग आणि ADAS फीचर्स दिले जातील. इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये eVitara, Creta साठी मोठी आव्हानात्मक ठरेल.
Kia त्यांच्या पुढील जनरेशन Seltos ला 2027 पर्यंत बाजारात आणण्याची योजना आखत आहे. नवीन मॉडेलमध्ये हायब्रिड पॉवरट्रेन, नवीन डिजिटल कॉकपिट आणि ADAS 2.0 यांसारखे फीचर्स मिळतील. आधुनिक डिझाइन आणि प्रगत सुविधा यामुळे ती Creta च्या समकक्ष ठरेल.
10 लाखांच्या बजेटमध्ये ‘या’ Cars मायलेजच्या बाबतीत नेहमीच टॉप मारतात
Nissan आपली नवीन SUV Tecton 2026 मध्ये लॉन्च करेल. ही SUV Renault Duster च्या प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. यात हायब्रिड इंजिन, नवीन डिझाइन आणि ऑफ-रोड मोड्स मिळतील. मजबूत बिल्ड क्वालिटीमुळे Tecton एक प्रॅक्टिकल आणि विश्वासार्ह पर्याय ठरू शकतो.
Skoda त्यांच्या Kushaq SUV चा फेसलिफ्ट 2026 च्या सुरुवातीला आणणार आहे. यात 360° कॅमेरा, ADAS, आणि मोठा इन्फोटेनमेंट स्क्रीन मिळेल. अपडेटेड डिझाइनमुळे ती आणखी आकर्षक बनेल.
Volkswagen देखील 2026 मध्ये Taigun चे फेसलिफ्ट मॉडेल सादर करणार आहे. यात ADAS, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, आणि नवीन बंपर डिझाइन मिळेल. मजबूत बॉडी आणि स्मूथ ड्रायव्हिंग अनुभवामुळे Taigun Creta ला ताकदीची टक्कर देऊ शकते.






