फोटो सौजन्य: @Hardwire_news (X.com )
देशात नेहमीच नवनवीन कार्स लाँच होत असतात. बदलत्या काळानुसार कार खरेदीदारांच्या अपेक्षा सुद्धा वाढल्या आहेत. यामुळेच आधुनिक फीचर्स आणि उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या कार लाँच करण्यावर ऑटो कंपन्यांचा जास्त भर असतो. देशात अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत. टाटा मोटर्स हे त्यातीलच एक आघाडीचे नाव.
टाटा मोटर्सच्या अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. Tata Altroz हे त्यातीलच एक कार. आज म्हणजेच 22 मे 2025 रोजी Tata Altroz चे Facelift व्हर्जन मार्केटमध्ये लाँच करण्यात आले आहे. जुन्या व्हर्जनच्या तुलनेत, फेसलिफ्टमध्ये एक्सटिरिअर आणि इंटिरिअरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. कंपनीने यात कोणत्या प्रकारचे फीचर्स दिले आहेत? यात किती इंजिन पर्याय दिले आहेत? ही कार कोणत्या किमतीत खरेदी करता येईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊयात.
लय वाईट ! ‘या’ कंपनीच्या विक्रीला उतरती कळा, अनुभवली 12 वर्षातील सर्वात मोठी घसरण
टाटा अल्ट्रोज फेसलिफ्टमध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. त्यात नवीन डिझाइन केलेले एलईडी डीआरएल, हेडलाइट आणि कनेक्टेड टेल लाईट्स देण्यात आले आहेत. याशिवाय, त्यात नवीन डिझाइन केलेले 16 इंच अलॉय व्हील्स, 360 डिग्री कॅमेरा, फ्लश डोअर हँडल, 90 डिग्रीपर्यंत उघडणारे दरवाजे, थ्री टोन इंटिरिअर, डी कट स्टिअरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल, अँबियंट लाईट, रिअर डिफॉगर, रिअर वायपर, रेन सेन्सिंग वायपर, 26.03 सेमी इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, अॅपल कार प्ले, एअर प्युरिफायर, 26.03 सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, रिअल टाइम नेव्हिगेशन, वायरलेस फोन चार्जर, एक्सप्रेस कूल एसी, इलेक्ट्रिक सनरूफ, रिअर एसी व्हेंट अशी फीचर्स आहेत.
कंपनीने नवीन कारमध्ये ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, ऑटो फोल्ड ORVM, ISOFIX चाइल्ड अँकरेज, TPMS, 6 एअरबॅग्ज, ESP, ABS, EBD, ई-कॉल यांसारखी सेफ्टी फीचर्स ऑफर केली आहेत.
टाटा अल्ट्रोज फेसलिफ्ट Dune Glow, Ember Glow, Royal Blue, Pure Grey आणि Pristine White रंगांच्या पर्यायांसह लाँच करण्यात आली आहे.
हायब्रीड इंजिन, 35 km चा मायलेज आणि अनेक सेफी फीचर्सने सुसज्ज असणाऱ्या ‘या’ SUVs लवकरच होणार लाँच
टाटा मोटर्स अल्ट्रोज फेसलिफ्ट पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीसह ऑफर करते. यात 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आहे. जे पॉवर आणि न्यूटन मीटर टॉर्क प्रदान करेल. त्याचे डिझेल इंजिन 200 न्यूटन मीटरचा टॉर्क देईल. सीएनजी इंजिनमुळे कारला न्यूटन मीटरची पॉवर आणि टॉर्क मिळेल. विशेष म्हणजे आता नवीन अल्ट्रोज मॅन्युअल, एएमटी आणि डीसीए ट्रान्समिशनच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आली आहे. त्याचे 5 स्पीड एएमटी ट्रान्समिशन आणि 6 स्पीड डीसीए फक्त पेट्रोलमध्येच दिले जाईल. तर पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी या तिन्ही इंजिनांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे.
टाटा मोटर्सने अल्ट्रोज फेसलिफ्ट 6.89 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) किमतीत लाँच केली आहे. ही या कारची सुरुवातीची किंमत आहे. त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 11.29 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.