जगभरात अनेक व्यक्तींना जुन्या, नव्या, महागड्या कैक वस्तूंचा संग्रह करण्याची आवड असते. मग त्या वस्तू कार गाड्या असोत, जुनी शस्त्र असोत, महागडे दागदागिने असोत कि इतर काहीही. तुम्ही कधी विचार केलायत का कि, जगातील सगळ्यात मोठं कारचं कलेक्शन कोणाकडे असेल? त्यात किती व कोणत्या कार असतील? चला तर जाणून घेऊयात या जगातील सर्वात मोठ्या कारच्या कलेक्शन बद्दल,
आग्नेय आशियातील ब्रुनेई देशाचे सुलतान, सुलतान हसनल बोलकिया यांच्याकडे जगातील सर्वात मोठ्या कारच्या संग्रहाचं श्रेय जातं. त्यांच्याकडे असणाऱ्या कारच्या कलेक्शन मध्ये सुमारे 7,000 गाड्या असल्याच मानलं जात. हा आकडा यापेक्षाही जास्त असल्याच सांगितलं जातं. एवढ्या संख्येने हा कारचा संग्रह असून, तो जगातील सर्वात मौल्यवान कार संग्रहांपैकी एक आहे. त्यांच्या या संग्रहाची किंमत अब्जावधी डॉलरमध्ये असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.
ब्रुनेईचा श्रीमंत सुल्तान, कोण आहे हाजी हसनल बोलकिया?
या कारच्या संग्रहात रोल्स-रॉयस, फरारी, लॅमबोर्गीनी, मर्सिडिज बेंझ, पॉर्शे,बेन्टली आणि BMW यांसारख्या जगप्रसिद्ध ब्रँड्सच्या गाड्या आहेत. विशेष म्हणजे सुलतान हसनल बोलकिया यांच्याकडे 600 हून अधिक रोल्स-रॉयस आणि 450 पेक्षा अधिक फरारी गाड्या असल्याचे सांगितले जाते. यातील बऱ्याचशा गाड्या त्यांच्या ऑर्डर नुसार तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांचाकडे असणाऱ्या त्या मॉडल जगात दुसरीकडे कुठेही नाहीत. अनेक गाड्यांवर सोन्याचा मुलामाही देण्यात आला आहे, आणि त्यांची रचना खूप आलिशान बनवण्यात आली आहे. त्यांच्या या कार त्यांच्या खासगी गॅरेजमध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
7000 आलिशान गाड्या, सोन्याचे घर… ‘अशी’ आहे ब्रुनेईच्या सुलतानची जीवनशैली
कारलव्हर्स आणि ऑटोमोबाईल तज्ञांसाठी हा संग्रह एक अद्भुत खजिनाच समाजला जातो. ब्रुनेईच्या सुलतानांचा कार संग्रह हा केवळ श्रीमंतीचे प्रतीक नव्हे, तर जगातील दुर्मिळ आणि ऐतिहासिक वाहनांचे जतन करणारा एक वारसा आहे. त्यामुळे त्यांचा संग्रह आजही जगातील सर्वात मोठा आणि चर्चेचा विषय मानला जातो.






