फोटो सौजन्य: @IvanLazarevski (X.com)
भारतातील ऑटो इंडस्ट्री ही खूप मोठी आहे. त्यामुळेच तर अनेक ऑटो कंपन्या भारतात उत्तम कार ऑफर करत असतात. देशात कारच्या विक्रीत सुद्धा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातही काही कंपन्या इलेक्ट्रिक कार देखील लाँच करत आहे, ज्यामुळे कंपनीच्या विक्रीत जोरदार वाढ होतेय. पण असे जरी असले तरी अशीही एक कंपनी आहे ज्यांना भारतात जास्त कार विकतच येत नाही आहे.
फ्रेंच कार उत्पादक कंपनी Citroën साठी भारतीय बाजारपेठेतील परिस्थिती आव्हानात्मक ठरत आहे. जानेवारी 2025 मध्ये सिट्रोएनची एकूण विक्री फक्त 470 युनिट्स इतकी झाली, जी कंपनीसाठी चिंताजनक बाब आहे. जानेवारी 2025 मध्ये, सिट्रोएन C5 एअरक्रॉस सारख्या मॉडेल्सचे एकही युनिट्स विकले गेले नाही. गेल्या 6 महिन्यांपासून कंपनीच्या विक्रीत सतत घट होताना दिसत आहे. कंपनीच्या अनेक कारची किती विक्री झाली आहे त्याबद्दल जाणून घेऊया.
आता ‘ही’ कार झाली अधिकच सुरक्षित; प्रत्येक व्हेरियंटमध्ये मिळणार 6 Airbag, किंमत फक्त…
सिट्रोएन C3: 242 युनिट्स
सिट्रोएन C3 Aircross: 107 युनिट्स
सिट्रोएन Basalt Coupe: 61 युनिट्स
सिट्रोएन eC3 (ईव्ही मॉडेल): 60 युनिट्स
सिट्रोएन C5 एअरक्रॉस – 0 युनिट्स
जानेवारी 2025 मध्ये सिट्रोएनची एकूण विक्री 5 मॉडेल्ससह 470 युनिट्स होती. कंपनीचे सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल बेसाल्ट कूप आणि सी3 आहेत. त्याच वेळी, सर्वात वाईट कामगिरी करणारा मॉडेल C5 एअरक्रॉस ठरला आहे, ज्याने गेल्या 6 महिन्यांत फक्त 7 युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या महिन्यात C5 एअरक्रॉसचा एकही युनिट विकला गेला नाही. आता आपण जाणून घेऊया की सिट्रोएनची विक्री का कमी होत आहे?
कार खरेदी करण्याची हीच संधी ! JSW MG च्या ‘या’ कार झाल्या दोन लाख रुपयांपर्यंत स्वस्त
मर्यादित ब्रँड ओळख: सिट्रोएन अजूनही भारतीय ग्राहकांमध्ये एक नवीन ब्रँड आहे आणि तिला टाटा, मारुती आणि ह्युंदाई सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करावी लागते.
डीलरशिप आणि सेवा नेटवर्कचा अभाव: सिट्रोएनची भारतात मर्यादित सेवा आहे. ज्यामुळे अनेक ग्राहक कंपनीच्या डीलरशिप आणि सर्व्हिस सेंटर्सवर कार खरेदी करण्यासाठी कचरतात.
किंमत: इतर कंपन्यांच्या तुलनेत सिट्रोएन मॉडेल्समध्ये “व्हॅल्यू फॉर मनी” हा घटक कमी असल्याचे दिसून येते.
ईव्ही मार्केटमधील अडचण: सिट्रोएन ईसी३ हे इलेक्ट्रिक मॉडेल आहे, परंतु टाटा नेक्सॉन ईव्ही आणि एमजी कॉमेट सारखे मॉडेल त्याच्याशी स्पर्धा देत आहेत.
सिट्रोएनला त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटर्जी मजबूत करण्याची आवश्यकता आहे. त्याच वेळी, मॉडेल्सच्या किंमती अधिक आकर्षक बनवण्याची आणि सर्व्हिस नेटवर्कचा विस्तार करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा, भारतातील त्याची विक्री आणखी कमी होऊ शकते.