फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटो बाजार म्हणजे व्यापाराची सुवर्ण संधी! याच संधीचे सोने करण्यासाठी अनेक विदेशी वाहन उत्पादक कंपन्या मार्केटमध्ये दमदार वाहन ऑफर करत असतात. तसेच त्यांच्या विद्यमान वाहनात महत्वाचे अपडेट देखील करतात. असेच अपडेट Yamaha त्यांच्या 20 पेक्षा जास्त मॉडेलमध्ये करत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
जपानी दुचाकी उत्पादक कंपनी यामाहा मोटर इंडियाने 11 नोव्हेंबर रोजी भारतीय बाजारात त्यांची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली होती. यासोबतच, कंपनीने नवीन Yamaha FZ RAVE आणि Yamaha XSR155 बाईक देखील लाँच केल्या. या दरम्यान, कंपनीने घोषणा केली की ती 2026 पर्यंत भारतात 10 नवीन मॉडेल्स लाँच करेल, ज्यामध्ये 2 इलेक्ट्रिक स्कूटरचाही समावेश असेल. भारतातील आपला पोर्टफोलिओ मजबूत करण्यासाठी आणि वाढत्या प्रीमियम आणि डिलक्स बाईक सेगमेंटमध्ये आपला वाटा वाढवण्यासाठी कंपनी हे महत्वाचे पाऊल उचलत आहे.
Dharmendra यांच्या Car Collection वर एकदा नजर टाकाच, पहिली कार तर फक्त 18,000 रुपयात केली होती खरेदी
यामाहा आता प्रीमियम आणि डिलक्स बाईक्सवर लक्ष केंद्रित करेल. सध्या, R15, MT15 आणि XSR155 सारख्या मॉडेल्सनी भारतीय बाजारपेठेत एक नवीन ट्रेंड सेट केला आहे. या बाईक्ससह, यामाहाने भारतीय ग्राहकांच्या मागण्या लक्षात घेऊन त्यांची उत्पादने डिझाइन केली आहेत. याव्यतिरिक्त, डिलक्स सेगमेंटला नवीन करण्यासाठी FZ-RAVE सारख्या नवीन बाईक्स सादर करण्यात आल्या आहेत.
यामाहाने भारतासाठी 2026 पर्यंतचा आपला रोडमॅप तयार केला आहे. कंपनी 2026 पर्यंत 10 नवे मॉडेल्स लाँच करण्याबरोबरच 20 हून अधिक प्रॉडक्ट्सना अपडेट करणार आहे. यामध्ये दोन ICE बाईक आणि दोन इलेक्ट्रिक स्कूटर्सचा समावेश आहे, ज्यापैकी काहींची घोषणा या आठवड्यातच करण्यात आली आहे.
जरी यामाहाचे अध्यक्ष ओतानी यांनी विक्रीचे ठोस लक्ष्य जाहीर केले नाही, तरी त्यांनी सांगितले की कंपनी आपली वार्षिक 1.5 मिलियन युनिट्स उत्पादन क्षमता पूर्ण क्षमतेने वापरण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.
भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार झपाट्याने वाढत असताना, यामाहाने या सेगमेंटमध्ये संतुलित धोरण स्वीकारले आहे. कंपनी 2026 च्या पहिल्या तिमाहीत आपल्या दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स, एरॉक्स E आणि EC-06 बाजारात आणणार आहे. या लाँचसाठी यामाहा प्रथम भारतातील चार प्रमुख मेट्रो शहरांपासून सुरुवात करणार असून, ही ती शहरे असतील जिथे EV स्वीकारण्याचा दर सर्वाधिक आहे.






