फोटो सौजन्य: Gemini
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे तसेच प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत आहे. गतवर्षभरात जिल्ह्यात १२९६ इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर उतरली असून, यामध्ये दोन चाकी वाहनांचा सर्वाधिक वाटा आहे. इंधन खर्चाची बचत आणि सोपी देखभाल या कारणांमुळे इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांकडून जास्त प्राधान्य मिळत आहे.
विक्रेता स्नेहदीप मेश्राम यांनी सांगितले की गेल्या दोन वर्षांत 66 इलेक्ट्रिक दुचाकीची मागणी जवळपास दुप्पट झाली आहे. ग्रामीण भागातही आता लोक ई-वाहनांची चौकशी करतात. सरकारने चार्जिंग स्टेशन वाढवले, तर विक्रीत आणखी मोठी वाढ होईल.
जगभरात Made In India कारचा डंका! ‘या’ कंपनीने थेट 12 लाख गाड्या केल्या निर्यात
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात जिल्ह्यात १२९६ ई-वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये दोन चाकी १०७०, तीन चाकी १७९, चार चाकी (एलएमव्ही) ४१ आणि सहा चाकी (एलजीव्ही) ६ वाहने आहेत. म्हणजेच, नागरिकांनी मुख्यत्वे दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांना अधिक पसंती दिली आहे. पर्यावरणपूरक आणि कमी खर्चिक पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे पारंपरिक वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहन चालवणे अधिक फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे नागरिकांचे कल वाढले आहे.
Tata Motors ला लागली दिवाळीची लॉटरी! ऑक्टोबर 2025 विक्रीचा आकडा पाहून प्रतिस्पर्ध्यांची झोप उडाली
जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढत असला, तरी चार्जिंग स्टेशनव्या सुविधेचा पूर्ण अभाव आहे. भंडारा आणि साकोली नगरपालिकेने ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत काही वर्षांपूर्वी चार्जिंग स्टेशन सुरू केले होते; मात्र ती आता कार्यान्वित नाहीत. नागरिकांच्या मते, शासनाने ई-वाहन वापराला प्रोत्साहन दिले असले तरी, त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात प्रशासन मागे पडले आहे. चार्जिंग स्टेशन उभारल्यास या वाहनांचा वापर अधिक सुकर होईल आणि नागरिकांचा विश्वास वाढेल.






