कारच्या इन्शुरन्ससाठी काय करावे (फोटो सौजन्य - iStock)
भारतात सणासुदीचा काळ हा आनंद आणि मोठ्या खरेदीचा काळ असतो. कारण या काळात खास ऑफर्स आणि शुभ मुहूर्त उपलब्ध असतात. मात्र, जर तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर केवळ वाहनच नव्हे तर इन्श्युरन्ससंदर्भातही योग्य आणि सुजाण निर्णय घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य वाहन निवडणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच योग्य इन्श्युरन्स पॉलिसीची निवडही अत्यावश्यक असते.
वाहनाचा इन्श्युरन्स ही केवळ कायदेशीर गरज नाही, तर अनपेक्षित नुकसानापासून तुमचे आणि तुमच्या वाहनाचे आर्थिक संरक्षण देणारी एक फायनान्शिअल सेफ्टी नेट आहे. योग्य कव्हरेजसह सर्वंकष पॉलिसी घेतल्यास थर्ड पार्टी नुकसान भरपाई, रस्त्यावर वाहनामध्ये काही बिघाड झाला असता सहाय्य, अपघाती नुकसानाचे विमा संरक्षण अशा विविध फायद्यांचा लाभ मिळू शकतो.
सोपी प्रक्रिया
पूर्वीपासूनच, वाहन इन्श्युरन्स खरेदीची प्रक्रिया ही अनेकांसाठी गुंतागुंतीची आणि गोंधळात टाकणारी असते. मात्र, फोनपेच्या विश्वसनीय आणि डिजिटल-प्रथम सोल्यूशन्समधील तज्ज्ञतेमुळे ही प्रक्रिया आता सोपी, पारदर्शक आणि परवडणारी झाली आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी फोनपेचे नवे वाहन इन्श्युरन्स सोल्युशन हे पारंपरिक डीलरशिप इन्श्युरन्स प्लॅनच्या तुलनेत अधिक किफायतशीर ऑनलाइन पर्याय देण्याचा उद्देश ठेवून तयार करण्यात आले आहे. या सुविधेमुळे तुम्ही एकाच ठिकाणी विविध इन्श्युरन्स कंपन्यांच्या पॉलिसींची तुलना करून फोनपे ॲपवरच थेट ऑनलाइन खरेदी करू शकता.
कार घेतली पण इन्शुरन्सचं काय? ‘या’ उपायाने निवडा योग्य इन्शुरन्स
प्लॅनची प्रमुख वैशिष्ट्ये
ही मर्यादित कालावधीसाठीची सणासुदीची ऑफर नसून, फोनपे ॲपवरील सर्व संभाव्य वाहन खरेदीदारांसाठी उपलब्ध असलेली एक नियमित सुविधा आहे. हा प्लॅन तुमचा संपूर्ण इन्श्युरन्स खरेदीचा अनुभव अधिक सोपा आणि पारदर्शक बनवतो, तसेच सणासुदीच्या काळात मोठ्या बचतीसह आनंदही वाढवतो.
तुम्ही सहजपणे विविध इन्श्युरन्स कंपन्यांच्या योजनांची तुलना करू शकता, गरजेनुसार योग्य योजना निवडू शकता आणि आवश्यक Add – On सह कव्हरेज वाढवू शकता. यामुळे तुमचे नवीन वाहन पहिल्याच दिवसापासून पूर्णपणे संरक्षित राहते आणि तुम्हाला इतर कसलीही काळजी न करता सणाचा आनंद घेता येतो.
नवीन गाडी घेतलीत पण इन्श्युरन्सचं काय? ‘या’ ॲपवर झटपट मिळेल इन्श्युरन्स
सोप्या स्टेप्स
खरेदी प्रक्रिया अतिशय सोपी आणि सुरळीत आहे. फोनपेचा नवा वाहन इन्श्युरन्स घेऊन मोठी बचत करण्यासाठी फक्त 5 सोप्या स्टेप्स फॉलो करा :






