फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये कार्सच्या विक्रीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. हीच वाढती मागणी पाहता, अनेक ऑटो कंपन्या भारतात बेस्ट कार ऑफर करत असतात. यातील काही कार्सचे हजारो युनिट्स रोज विकले जात आहे. पण असे जरी असले तरी होंडाच्या एका कारकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. परिणामी या कारच्या विक्रीत मोठी घाट दिसून आली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारतीय ग्राहकांमध्ये सेडान कार नेहमीच लोकप्रिय राहिल्या आहेत. या सेगमेंटमध्ये Honda City, Hyundai Verna, Honda Amaze आणि Maruti Suzuki Dzire सारख्या कार खूप लोकप्रिय आहेत. परंतु, गेल्या महिन्यात म्हणजेच April 2025 मध्ये होंडाच्या लोकप्रिय सेडान City च्या विक्रीत मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे.
Ola Roadster साठी 10 हजारांचे Down Payment केल्यास किती असेल EMI?
गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल 2025 मध्ये होंडा सिटीच्या विक्रीत वार्षिक आधारावर 50.73 टक्क्यांनी घट झाली. या काळात, होंडा सिटीला फक्त 406 नवीन ग्राहक मिळाले. तर अगदी 1 वर्षापूर्वी म्हणजे एप्रिल 2024 मध्ये, होंडा सिटीला एकूण 824 नवीन ग्राहक मिळाले. चला होंडा सिटीच्या फीचर्स, पॉवरट्रेन आणि किमतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जर आपण Honda City च्या पॉवरट्रेनबद्दल बोललो तर, होंडा सिटीमध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन आहे,जे 121bhp ची कमाल पॉवर आणि 145Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारचे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्टेप सीबीटी गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीचा दावा आहे की १.५-लिटर ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये १७.८ किमी प्रति लिटर मायलेज मिळते. तर 1.5-लिटर सीबीटी व्हेरिएंट प्रति लिटर 18.4 किमी पर्यंत मायलेज देते. बाजारात, होंडा सिटीची स्पर्धा फोक्सवॅगन व्हर्टस, मारुती सियाझ, स्कोडा स्लाव्हिया आणि ह्युंदाई व्हर्ना यांच्याशी आहे.
फुल्ल टॅंकमध्ये 700 KM ची रेंज ! 67 हजार रुपये किंमत असणारी बाईक खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड
दुसरीकडे, कारच्या इंटिरिअरमध्ये 8 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्रूझ कंट्रोल आणि सनरूफ सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय, सेफ्टीसाठी कारमध्ये 6 एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि ADAS टेक्नॉलजी देखील प्रदान करण्यात आले आहे. होंडा सिटी ही 5 सीटर कार आहे ज्याची बाजारात सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 12.28 लाख रुपयांपासून सुरु होते, जी टॉप मॉडेलमध्ये 16.65 लाख रुपयांपर्यंत आहे.