पगार 40 हजार आणि स्वप्न नवीन Mahindra Bolero खरेदी करण्याचे?
महिंद्रा बोलेरो ही 7 सीटर कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे आणि देशातील सर्वात परवडणारी डिझेल कार आहे. ही कार अलीकडेच नवीन अपडेट्ससह 7.99 लाखांमध्ये लाँच करण्यात आली आहे. जर तुमचा पगार 40 हजार असेल आणि तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कशाप्रकारे बजेट प्लॅनिंग करून ही कार तुम्ही घरी आणू शकता त्याबद्दल जाणून घेऊयात.
Rolls Royce सोडून Mukesh Ambani यांचा जावई फिरतोय ‘या’ कारमधून, इतकं काय आहे खास?
नवीन बोलेरोच्या एक्स-शोरूम किमतीत 69 हजार 912 आरटीओ चार्जेस आणि 42 हजार 160 रुपये समाविष्ट आहे. यामुळे या एसयूव्हीची एकूणऑन-रोड किंमत 9.11 लाख रुपये होते. जर तुम्ही हे वाहन खरेदी करण्यासाठी 1 लाखाचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला 8.11 लाखाचे कार लोन घ्यावे लागेल.
जर तुम्हाला हे कर्ज 10% व्याजदराने 5 वर्षांसाठी मिळाले तर तुम्हाला दरमहा 17 हजार 233 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. म्हणून, जर तुम्ही दरमहा 40 से 50 हजार कमावत असाल तर तुम्ही ही कार ईएमआयवर खरेदी करण्याचा विचार करू शकतात.
महिंद्रा बोलेरो निओमध्ये 1.5-लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे, जे 100 bhp ची पॉवर निर्माण करते. या SUV मध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आले असून, महिंद्राच्या मते या नव्या व्हर्जनमध्ये राइड क्वालिटी आणि हँडलिंग पूर्वीपेक्षा अधिक सुधारण्यात आले आहे. त्यामुळे ही कार शहरात आणि ग्रामीण भागातही सहज आणि आरामदायीपणे चालवता येते.
जगभरात Made In India कारचा डंका! ‘या’ कंपनीने थेट 12 लाख गाड्या केल्या निर्यात
महिंद्राने आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV बोलेरोला नव्या टचस्क्रीन सिस्टम आणि आधुनिक डिझाइनसह अपडेट केले आहे. यात नवीन ग्रिल, अलॉय व्हील्स आणि अपडेटेड फॉग लॅम्प्स देण्यात आले आहेत. आतील भागात स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स आणि काही नवीन कम्फर्ट फीचर्स जोडले गेले आहेत, ज्यामुळे बोलेरो आता अधिक मॉडर्न आणि प्रीमियम अनुभव देते.
भारतीय बाजारात महिंद्रा बोलेरो ही टाटा नेक्सॉन, मारुती अर्टिगा आणि मारुती ब्रेझा यांसारख्या कारांना टक्कर देते. या गाड्या जरी वेगवेगळ्या सेगमेंटमधील असल्या, तरी किंमत आणि फीचर्सच्या दृष्टीने बोलेरो त्यांच्यासमोर मजबूत स्पर्धा उभी करते.






