Rolls Royce सोडून Mukesh Ambani यांचा जावई फिरतोय 'या' कारमधून,
जेव्हा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींबद्दल चर्चा होते, तेव्हा आपसूकच सर्वात पहिले नाव Mukesh Ambani यांचे येते. मुकेश अंबानी त्यांच्या आलिशान कार कलेक्शनसाठी देखील ओळखले जातात. फक्त त्यांच्याकडेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांकडे सुद्धा आलिशान कार आहेत. नुकतेच त्यांचे जावई आनंद पिरामल रोल्स रॉईस किंवा मर्सडिज नव्हे अशा कारमधून फिरताना दिसले आहे जी इतर आलिशान कारच्या तुलनेत खूप स्वस्त आहे. चला जाणून घेऊयात Toyota Camry मध्ये इतकं खास काय आहे ?
खरं तर, आनंद पिरामल अलीकडेच एका व्हिडिओमध्ये त्यांची टोयोटा कॅमरी चालवताना दिसले. सुरक्षा रक्षकांनी वेढलेल्या कारच्या पुढच्या सीटवर ते बसले होते. आनंद कॅमरीमध्ये दिसण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. गेल्या वर्षी, तो अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वीच्या डिनरमध्ये त्याच कारमध्ये आले होता. काही महिन्यांपूर्वी, आनंद आणि ईशा अंबानी कॅमरीमध्ये डिनर डेटवर जाताना दिसले होते, तर त्यांच्यासोबत Rolls-Royce Cullinan, Mahindra Scorpio आणि Toyota Fortuner सारख्या लक्झरी एसयूव्ही होत्या. यावरून स्पष्ट होते की आनंद पिरामल दिखाऊपणापेक्षा साधेपणावर विश्वास ठेवतात.
भंडाऱ्यात इलेक्ट्रिक वाहने सुसाट! वर्षभरात 1296 ई- वाहनांची विक्री, मात्र चार्जिंग स्टेशनचा अभाव
टोयोटा कॅमरी ही नेहमीच एक लक्झरी हायब्रिड सेडान म्हणून ओळखली जाते. आनंद ज्या मॉडेलचा वापर करतात, ती मागील जनरेशनची कॅमरी आहे, ज्याची किंमत सुमारे 46 लाख रुपये होती. ही कार आपल्या स्मूद ड्रायव्हिंग, सायलेंट इंजिन आणि उत्कृष्ट फ्युएल एफिशिएंसीसाठी प्रसिद्ध आहे. 2025 मॉडेलची किंमत 47.48 लाख ते 47.62 लाख रुपये दरम्यान आहे.
या कारमध्ये C-शेप LED DRLs, स्लीक LED हेडलाइट्स, 18-इंच डायमंड-कट अलॉय व्हील्स आणि रॅपअराउंड LED टेललाइट्स देण्यात आल्या आहेत, ज्या कॅम्रीला एक शार्प आणि आधुनिक लुक देतात.
Tata Motors ला लागली दिवाळीची लॉटरी! ऑक्टोबर 2025 विक्रीचा आकडा पाहून प्रतिस्पर्ध्यांची झोप उडाली
या कारच्या आत 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, 10-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, आणि 9-स्पीकर JBL साउंड सिस्टीम मिळते. याशिवाय, व्हेंटिलेटेड सीट्स, मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल, आणि इलेक्ट्रिक रिअर सीट ॲडजस्टमेंट यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे ही कार कोणत्याही प्रीमियम सेडानपेक्षा कमी नाही. या सर्व फीचर्समुळे कॅम्रीमध्ये Rolls-Royce किंवा Mercedesसारखी लक्झरी फील मिळते.
नवीन टोयोटा कॅम्रीमध्ये 2.5-लीटर 4-सिलेंडर पेट्रोल-हायब्रिड इंजिन देण्यात आले आहे, जे 230 bhp पॉवर आणि 221 Nm टॉर्क निर्माण करते. यासोबत eCVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले असून, यात स्पोर्ट, ईको आणि नॉर्मल असे तीन ड्रायव्हिंग मोड्स उपलब्ध आहेत.






