AC चालू झाल्यावर लगेच पडतो इंजिनावर दबाव
कारचा AC सरळ इंजिनाबरोबर जोडलेला असतो. AC चा कम्प्रेसर इंजनाच्या पावरनेच चालतो. त्यामुळेच आपण जेव्हा AC चालू करतो, इंजिन अजून जास्त मेहनत करण्यास भाग पडते. या अतिरिक्त कामासाठी इंजिन जास्त इंधन जळवते. हेच कारण आहे कि AC चालवल्यामुळे जास्त इंधन खर्ची केले जाते. शहरांच्या ट्राफिकमध्ये ही गोष्ट जास्त प्रकर्षाने दिसून येते.
सामान्य स्थितीमध्ये किती इंधन खर्ची होते?
ऑटोमोबाइल इंडस्ट्रीच्या आकड्यांनुसार नेहमीच्या वातावरणात आणि नेहमीच्या ड्राइविंगमध्ये कारचा AC जवळजवळ 0.2ते 0.4 लिटर जास्त इंधन प्रत्येक तासाला जळवतो. हे वाहनांच्या इंजिनावर, वातावरणावर आणि AC च्या सेटिंग्जवरही अवलंबून असते. जर बाहेरचे वातावरण जास्त उष्ण आहे, तर AC ला केबिन थंड ठेवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते; आणि बरोबरच जास्त इंधन जळते.
छोट्या आणि मोठ्या कारमध्ये काय फरक पडतो?
वाहनाचा आकार इंधनाच्या खर्चावर मोठा परिणाम करतो. छोट्या कारच्या केबिनचा आकार लहान असतो म्हणून त्याला थंड करण्यासाठी AC ला जास्त मेहनत करावी लागत नाही. अशा छोट्या कारसाठी 0.2लिटर एवढे इंधन दरतासी पुरेसे होते. दुसरीकडे SUV सारख्या मोठ्या गाड्यांचा आकार आणि कम्प्रेसर मोठा असल्याने, ACची मेहनत जास्त होऊन 0.8 लिटरपर्यंत इंधनाची खपत होऊ शकते.
मायलेज वर होतो डायरेक्ट परिणाम
जर तुम्ही नियमित ACचा वापर करत असाल, तर याचा कारच्या मायलेज वरही खूप प्रमाणात परिणाम होतो. तज्ञांच्या मते मोठ्या प्रवासादरम्यान सतत AC चालू असेल तर, एकूण इंधनाच्या वापरापेक्षा 8 ते 10 टक्क्यांनी यात वाढ होऊ शकते.
उभ्या कारमध्ये AC चालवणे म्हणजे खर्चाला बळी
खूप सगळे लोक पार्किंगमध्ये वाट पाहत असताना इंजिन चालू ठेऊन AC चालवत असतात. ही सवय इंधन वाचवण्यासाठी अजिबात चांगली नाही. उभ्या कारमध्ये इंजिन सतत इंधन जाळत असतं, पण वाहन अंतर कापत नसतं. अशावेळी विना मायलेजचं प्रत्येक मिनिटाला इंधन खर्च होत असतं.






