फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे इंधनाच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ. इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या किंमती वाढल्यामुळे, ग्राहक पर्यावरणपूरक आणि कमी खर्चिक विकल्पांकडे वळले आहेत. पूर्वी ज्या कंपन्यांनी केवळ इंधनावर चालणाऱ्या कार बनवलेल्या होत्या, त्या आता इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. या बदलामुळे ग्राहक देखील इलेक्ट्रिक कार्सला उत्तम प्रतिसाद देत आहेत. या वाहनांचा कमी खर्च, कमी प्रदूषण आणि सुधारित तंत्रज्ञान यामुळे इलेक्ट्रिक कार्सचा भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणावर स्वीकार होत आहे.
आज अनेक ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे. पण त्यातही ग्राहक खासकरून टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक कारला आपली पसंती दर्शवत आहेत. जर आपण गेल्या महिन्याबद्दल म्हणजेच फेब्रुवारी 2025 बद्दल बोललो तर टाटा मोटर्सने या विभागातील विक्रीत अव्वल स्थान मिळवले. या काळात टाटा मोटर्सने एकूण 3,825 युनिट इलेक्ट्रिक कार विकल्या. परंतु, या काळात टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत वार्षिक आधारावर 24.21 टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच एकूण इलेक्ट्रिक कार विक्रीत एकट्या टाटा मोटर्सचा मार्केट शेअर 42.65 टक्के होता. गेल्या महिन्यातील 10 सर्वात मोठ्या कार विक्री कंपन्यांच्या विक्रीबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
विक्री यादीत एमजी मोटर्स दुसऱ्या स्थानावर आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये एमजी मोटर्सने एकूण 3,270 कार विकल्या. तर या विक्री यादीत ह्युंदाई तिसऱ्या स्थानावर होती. या काळात हुंडईने एकूण 738 कार विकल्या. याशिवाय, या विक्री यादीत महिंद्रा चौथ्या स्थानावर होती. या काळात महिंद्राने एकूण 478 युनिट्स इलेक्ट्रिक कार विकल्या. त्याच वेळी, BYD या विक्री यादीत पाचव्या क्रमांकावर होती. या काळात BYD ने एकूण 254 युनिट्स इलेक्ट्रिक कार विकल्या.
भारतातील सर्वात 5 महागड्या कारवर ‘या’ श्रीमंत लोकांनी कोरले आपले नाव, किंमत एकदा वाचाच
दुसरीकडे, या विक्री यादीत बीएमडब्ल्यू सहाव्या स्थानावर होती. फेब्रुवारीत बीएमडब्ल्यूने एकूण 219 कार विकल्या. तर मर्सिडीज या विक्री यादीत सातव्या स्थानावर होती. या काळात मर्सिडीजने एकूण 67 युनिट्स इलेक्ट्रिक कार विकल्या. याशिवाय, या विक्री यादीत सिट्रोएन आठव्या स्थानावर होती. या काळात सिट्रोएनने एकूण 59 कार विकल्या. तर व्होल्वो या विक्री यादीत नवव्या स्थानावर होती. व्होल्वोने एकूण 21 कार विकल्या. याशिवाय, दहाव्या स्थानावर असलेल्या किआने या काळात फक्त 19 युनिट्स कार विकल्या.