फोटो सौजन्य: @volklub (X.com)
भारतात विविध सेगमेंटमध्ये कार्स विकल्या जातात. यातही भारतीय ग्राहकांची पहिली पसंत ही एसयूव्ही कार्सना जास्त असते. त्यामुळेच तर अनेक ऑटो कंपन्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये उत्तम फिचर्स असणाऱ्या कार्स लाँच करत असतात. आता तर इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील मार्केटमध्ये लाँच होताना दिसत आहे. ह्युंदाई कंपनी देखील चांगल्या परफॉर्मन्स देणाऱ्या एसयूव्ही मार्केटमध्ये आणताना दिसत आहे. नुकतेच कंपनीने त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही Exter चा नवीन सीएनजी व्हेरियंट बाजारात आणला आहे. हा व्हेरिएंट आता या सीरिजमधील सर्वात किफायतशीर ऑप्शन ठरला असून, त्याची एक्स-शोरूम किंमत केवळ 7.50 लाख रुपये आहे. मायलेज आणि सुरक्षिततेच्या बाबतीत हे मॉडेल उत्कृष्ट पर्याय मानले जात असून ही कार मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक उत्तम ऑप्शन ठरत आहे.
राजधानी दिल्लीमध्ये या कारची अंदाजे ऑन-रोड किंमत 8.44 लाख रुपये आहे. जर तुम्ही सुरुवातीला 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले, तर उर्वरित 6.44 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. हे कर्ज जर 9.5% व्याजदराने 5 वर्षांच्या कालावधीसाठी घेतले गेले, तर तुमचा दरमहा EMI जवळपास 13,500 रुपये इतका असेल. अशा रीतीने, पाच वर्षांत तुम्ही बँकेला एकूण 8.11 लाख रुपये द्याल. लक्षात घ्या की, EMI, व्याजदर आणि कर्जाचे अटी तुमच्या क्रेडिट स्कोअर आणि निवडलेल्या बँकेवर बदलू शकतात. तसेच, वेगवेगळ्या शहरांमध्ये या कारची ऑन-रोड किंमत थोडी वेगळी असू शकते.
नवीन Maruti Suzuki Grand Vitara खरेदी करणे झाले महाग, ‘या’ व्हेरियंटची वाढली किंमत?
Hyundai Exter CNG ही केवळ परवडणारीच कार नसून ती अनेक प्रीमियम फिचर्सने सुसज्ज आहे. सर्व व्हेरियंट्समध्ये 6 एअरबॅग्ज, प्रत्येक प्रवाशासाठी 3-पॉइंट सीट बेल्ट, सीट बेल्ट रिमाइंडर आणि सेंट्रल लॉकिंग सिस्टम यांसारखे सिक्योरिटी फीचर्स देण्यात आले आहेत, जे तुमचा प्रवास अधिक सुरक्षित बनवतात.
या एसयूव्हीमध्ये 1.2 लिटर 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे CNG वर चालवले असता 27.1 किलोमीटर प्रति किलोग्राम पर्यंतचा मायलेज देते. ड्युअल सिलेंडर टेक्नॉलजीमुळे 391 लिटर पर्यंत बूट स्पेसही उपलब्ध आहे. हे फीचर्स Exter CNG ला इंधन कार्यक्षमता आणि जागेच्या बाबतीत अधिक उत्तम पर्याय बनवते.