जर GST कमी झालाच तर Tata Curvv खरेदीदारांची मज्जा मज्जा
कार खरेदी करताना आपल्याला एक्स शोरूम किंमत दाखवली जाते. मात्र, जेव्हा प्रत्यक्षात कार खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपल्याला ती कार ऑन रोड किमतीत खरेदी करावी लागते. या ऑन रोड किमतीत GST चा समावेश असतो. त्यामुळे अनेक जण जीएसटी कधी कमी होणार या प्रतीक्षेत असतात.
आता मोदी सरकार यंदाच्या दिवाळीत अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील GST कमी करण्याचा विचार करत आहे. यामध्ये लहान कार्सचाही समावेश आहे. या कार्सवर 28% जीएसटी आणि 1% सेस म्हणजेच एकूण 29% कर आकारला जातो. पण जर 10% कमी केला तर ग्राहकांना मोठा फायदा होईल. अशा परिस्थितीत, जर तुम्ही टाटा कर्व्ह खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर येत्या काळात या कारची किंमत किती बदलू शकते. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
एथर कम्युनिटी डे निमित्ताने एथर एनर्जीने केले ईएल स्कूटर प्लॅटफॉर्मचे अनावरण
टाटा कर्व्हची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख रुपये आहे. जर या कारवर 19% जीएसटी लावला तर ग्राहकांना 99,999 रुपयांचा फायदा मिळू शकतो. अशाप्रकारे, टाटा कर्व्हची एक्स-शोरूम किंमत 8.99 लाख रुपये होईल.
टाटा कर्व्हमध्ये 12.3-इंचाचा मोठा टच स्क्रीन इंफोटेंमेंट सिस्टम, पूर्णपणे डिजिटल instrument cluster, फ्लश डोर हँडल्स आणि जेस्चरने उघडणारा टेलगेट, तसेच 18-इंचाचे स्टायलिश अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. भारतीय बाजारात कर्व्ह तीन वेगवेगळ्या इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे, ज्यामध्ये दोन पेट्रोल आणि एक डिझेल इंजिन समाविष्ट आहे.
पहिला 1.2-लीटर Revotron पेट्रोल इंजिन आहे, जो 118 hp ची पॉवर आणि 170 Nm टॉर्क निर्माण करतो. हा इंजिन चांगल्या मायलेजसह दररोजच्या commuting साठी एक उत्तम पर्याय ठरतो. दुसरा 1.2-लीटर Hyperion Turbo-Petrol इंजिन असून तो 123 hp ची पॉवर आणि 225 Nm टॉर्क देतो. हा इंजिन विशेषतः स्पोर्टी आणि दमदार राइडसाठी डिझाइन करण्यात आला आहे.
Renault ची ‘ही’ अफलातून कार फक्त 2 लाखात आणा घरी! असा असेल EMI चा संपूर्ण हिशोब
तिसरा पर्याय म्हणजे 1.5-लीटर डिझेल इंजिन, जो 116 hp ची पॉवर आणि 260 Nm टॉर्क निर्माण करतो. हा इंजिन लांब पल्ल्याच्या प्रवासांसाठी आणि उत्कृष्ट fuel efficiency साठी अत्यंत उपयुक्त आहे. या तिन्ही इंजिन पर्यायांसोबत कंपनीने 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 7-स्पीड Dual Clutch Automatic (DCA) गिअरबॉक्सचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.