फोटो सौजन्य: iStock
आपली स्वतःची कार असावी हे प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीचे स्वप्न असते. पण यातही जेव्हा आपण कार खरेदी करतो तेव्हा आपल्याला समजते की कार खरेदी करण्यापेक्षा तिला मेंटेन ठेवणे कठीण असते. अनेकदा कार चालवताना त्याच्या टायरची हवा कमी होते, जेणेकरून कार चालक गोंधळून जातात.
कार मालकांना भेडसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे जेव्हा तुम्हाला तुमच्या कारमधून कुठेतरी जायचे असते तेव्हाच कारच्या टायरमध्ये हवा कमी असणे. जर तुम्ही कमी हवेच्या दाबाने कार चालवत असाल तर टायर पंक्चर होण्याचा धोका अधिक वाढतो. एवढेच काय तर कधीकधी कारचे केबिन इतके घाणेरडे होते की तुम्हाला तुमची कार सर्व्हिसिंग आणि ड्राय क्लीनिंगसाठी द्यावी लागते. हीच बाब लक्षात घेता, आज आपण एक अशा डिव्हाइसबद्दल जाणून घेणार आहोत जे ही दोन्ही कामे करू शकतील.
‘या’ ऑटो कंपनीची कामगिरीच भारी ! 70 देशांमध्ये निर्यात केल्या 6 लाखांपेक्षा जास्त Made In India कार
खरंतर, कार पार्ट्सच्या क्षेत्रात Uno Minda नावाची एक प्रसिद्ध कंपनी आहे आणि ती हे टू इन वन व्हॅक्यूम क्लिनर आणि टायर इन्फ्लेटर विकते. आज याच कंपनीच्या Car Vacuum Cleaner बद्दल जाणून घेणार आहोत.
Car 2 in 1 Vacuum cleaner with Tyre inflator च्या डिझाइन आणि बिल्डबद्दल बोलायचे झाले तर, ते विविध पार्टसमध्ये येते. म्हणजे, जेव्हा तुम्ही हा डिव्हाइस खरेदी करता तेव्हा तुम्हाला ते दोन पार्ट्समध्ये मिळते जे तुम्ही तुमच्या गरजेनुसार असेम्ब्ल करू शकता. त्याचा पुढचा भाग नोजल आणि फिल्टर आहे जो तुम्ही व्हॅक्यूम क्लिनरसारखा वापरू शकता, तर दुसरा भाग मुख्य कंप्रेसर आहे. जर त्यात नोजलचा भाग जोडला तर तो व्हॅक्यूम क्लिनर बनतो.
हे एक हलके डिव्हाइस आहे जे एक महिला देखील सहज उचलू शकते. त्याचे डिझाइन प्लास्टिक मटेरियलपासून बनलेली आहे. जर या डिव्हाइसला धक्का बसला किंवा तो पडला तर नोजलचा भाग खराब होऊ शकतो.
‘ही’ कार खरेदी केल्यास चक्क मिळत आहे Gold Coin, कंपनीच्या विशेष ऑफरबद्दल जाणून घ्या
हे डिव्हाइस वापरणे अत्यंत सोपे आहे. या डिव्हाइसने जर तुम्हाला कार स्वच्छ करायची असेल तर तुम्हाला फक्त नोजलचा भाग कंप्रेसरला जोडून तो कारच्या चार्जिंग पोर्टशी जोडावा लागेल. यानंतर तुम्ही पॉवर बटण दाबून ते साफ करू शकता. हे खूप प्रभावी स्वच्छता प्रदान करते आणि यामुळे धुळीचे कण सहजपणे काढले जाऊ शकते.
जर तुम्ही एअर कॉम्प्रेसरचा भाग वापरत असाल तर तुम्हाला अटॅचमेंट पाईप आणि नोजल जोडावे लागतील आणि नंतर तुम्हाला कंप्रेसरवर एक एअर गेज मिळेल ज्याच्या मदतीने तुम्ही टायर फुगवताना दाब तपासू शकता. या कंप्रेसरने टायर प्रेशरचे निरीक्षण करणे आणि टायर सुरक्षितपणे फुगवणे अत्यंत सोपे आहे.