फोटो सौजन्य: MoreMotorcycles/ X.com
भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम कंपन्या आहेत, ज्या बेस्ट बाईक ऑफर करत असतात. अशीच एक कंपनी म्हणजे Kawasaki. भारतात हाय परफॉर्मन्स बाईकची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. यातही कावासाकीच्या बाईक म्हणजे तरुणांच्या आवडत्या बाईक. नुकतेच कंपनीने त्यांची एक बाईक नवीन इंजिनसह लाँच केली आहे.
कावासाकीने भारतात त्यांच्या Versys 1100 चा नवीन 2026 मॉडेल लाँच केले आहे. ही बाईक 13.79 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच केले गेले आहे. Versys 1100 ही फेब्रुवारी 2025 मध्ये व्हर्सिस 1000 ची जागा म्हणून लाँच करण्यात आली होती. ही ॲडव्हेंचर टूरर बाईक शहरातील रस्त्यांपासून ते महामार्गांपर्यंत सर्वत्र उत्कृष्ट परफॉर्मन्स करण्यास सक्षम आहे. चला या बाईकच्या खास फीचर्सवर बारकाईने नजर टाकूया.
फक्त ‘इतक्या’ किमतीत Nissan Magnite AMT मध्ये बसवून मिळेल CNG किट
या कावासाकी बाईकमध्ये 1,099cc, लिक्विड-कूल्ड, इनलाइन फोर-सिलेंडर इंजिन वापरले आहे जे 135 पीएस पॉवर आणि 112 एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 6-स्पीड रिव्हर्स-शिफ्ट गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. नवीन व्हर्सिस 1000 हाय आरपीएमवर सुधारित पॉवर आणि सुरळीत परफॉर्मन्स देते.
नवीन व्हर्सिस 1100 ही ड्युअल-टोन रंग पर्यायांमध्ये लाँच करण्यात आली आहे: मेटॅलिक मॅट ग्राफीन स्टील ग्रे / मेटॅलिक डायब्लो ब्लॅक. हा राखाडी आणि काळा रंग बाईकच्या मस्क्युलर डिझाइनला आणखी उजळ करतो. हिरवा ‘VERSYS’ अक्षरे आणि बाजूंना सूक्ष्म ग्राफिक्स तिला स्पोर्टी लूक देतात.
नवीन Versys 1100 मध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये क्रूझ कंट्रोल दिले आहे, ज्यामुळे लांब प्रवासादरम्यान रायडरला सतत थ्रॉटल पकडून ठेवण्याची गरज भासत नाही.
Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ
बाईकमध्ये कावासाकी ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम अंतर्गत तीन मोड्स दिले आहेत, जे ओलसर किंवा घसरट रस्त्यांवरही उत्तम ट्रॅक्शन राखतात. याशिवाय, यात IMU (Inertial Measurement Unit) टेक्नॉलॉजी दिलेले आहे, जे ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, इंजिन ब्रेकिंग आणि राइडिंग मोड्स यांचे नियंत्रण करते. या सर्व प्रणालींमुळे बाईकची स्थिरता आणि नियंत्रणक्षमता दोन्ही अधिक वाढतात, ज्यामुळे रायडिंग अनुभव अधिक सुरक्षित आणि आरामदायक होतो.