फोटो सौजन्य: @volklub/X.com
Nissan मोटर इंडियाने त्यांच्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही, न्यू निसान मॅग्नाइट बीआर-10 ईझी-शिफ्ट (एएमटी) साठी सरकारमान्य सीएनजी रेट्रोफिटमेंट कार्यक्रमाचा विस्तार जाहीर केला आहे. या उपक्रमामुळे ग्राहकांना आता फॅक्टरी-मंजूर, उच्च-गुणवत्तेचे आणि अधिक कार्यक्षम सीएनजी सोल्यूशन उपलब्ध होणार आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला मॅन्युअल ट्रान्समिशन (बीआर-10 एमटी) व्हर्जनसाठी सुरू केलेल्या रेट्रोफिटमेंट कार्यक्रमाला ग्राहकांकडून अत्यंत उत्साही प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे कंपनीने ईझी-शिफ्ट (एएमटी) प्रकारातही हा कार्यक्रम सुरू केला आहे. हा निर्णय निसानच्या ग्राहककेंद्री, परवडणाऱ्या आणि शाश्वत गतिशीलता उपायांबद्दलच्या बांधिलकीचे प्रतीक आहे.
या नव्या रेट्रोफिटमेंटमध्ये इंधन लीड डिझाइन सादर करण्यात आले आहे. आता सीएनजी फिलिंग व्हॉल्व्ह इंजिन-कंपार्टमेंटऐवजी सध्याच्या फ्युएल भरण्याच्या झाकणात बसवले आहे, ज्यामुळे इंधन भरणे अधिक सोयीचे, जलद आणि सुरक्षित झाले आहे. यामुळे वापरकर्त्यांचा दररोजचा अनुभव आणखी सुधारला आहे.
10 एअरबॅग्स आणि ADAS ची सेफ्टी! भारतात Skoda Octavia RS लाँच
सीएनजी रेट्रोफिटेड न्यू निसान मॅग्नाइट 3 वर्षे किंवा 1 लाख किमी वॉरंटीसह उपलब्ध असून, ग्राहकांना निसानच्या विश्वासार्ह परफॉर्मन्ससह सीएनजीची आर्थिक बचत देखील अनुभवता येणार आहे.
कंपनीने ग्राहकांच्या फायद्यासाठी सीएनजी रेट्रोफिटमेंट किटची एमआरपी ₹71,999 इतकी जाहीर केली असून, जीएसटी दर 28% वरून 18% पर्यंत कमी केल्यानंतरही किंमत कायम ठेवण्यात आली आहे. ही किंमत 22 सप्टेंबर 2025 पासून भारतातील सर्व अधिकृत निसान सीएनजी रेट्रोफिटमेंट केंद्रांवर लागू आहे.
या घोषणेबद्दल बोलताना निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स म्हणाले, “न्यू निसान मॅग्नाइट बीआर-10 ईझी-शिफ्ट (एएमटी) मध्ये रेट्रोफिटमेंट कार्यक्रमाचा विस्तार करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. हा उपक्रम आमच्या सीएनजी प्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो निसानच्या अभियांत्रिकी उत्कृष्टतेला परवडणाऱ्या किंमतीत उत्तम सोयीसह एकत्र आणतो.”
ही आहे सोन्याची ताकद! 2015 ते 2025 पर्यंत, 1 Kg सोन्याच्या किमतीत येतील एकापेक्षा एक आलिशान कार
निसानचा सीएनजी रेट्रोफिटमेंट कार्यक्रम आता भारतातील 13 राज्यांमध्ये उपलब्ध आहे, दिल्ली-एनसीआर, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, केरळ, कर्नाटक, राजस्थान, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तामिळनाडू. हा पर्याय फक्त न्यू निसान मॅग्नाइट साठी उपलब्ध असून, यात 1.0 -लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे मॅन्युअल आणि एएमटी दोन्ही ट्रान्समिशनमध्ये येते.
सुरक्षेच्या दृष्टीने, न्यू निसान मॅग्नाइट ही 6 एअरबॅग्जसह भारतातील सर्वात सुरक्षित बी-एसयूव्हींपैकी एक मानली जाते. या कारला जीएनसीएपीकडून 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. तसेच, ग्राहकांना अधिक विश्वास देण्यासाठी कंपनीने 10-वर्षांची विस्तारित वॉरंटी योजना सादर केली आहे.
अलीकडेच निसानने “कुरो एडिशन” देखील बाजारात आणले आहे, ज्यामध्ये ब्लॅक थीम, रिफाइन्ड इंटिरिअर आणि जपानी-प्रेरित डिझाइन आहे. या सर्व नवकल्पनांमुळे न्यू निसान मॅग्नाइट ही भारतातील सर्वात आकर्षक, मूल्य-समृद्ध आणि शाश्वत कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणून आपले स्थान अधिक मजबूत करत आहे.