फोटो सौजन्य: @Dhoniismforlife (X.com
भारतीय मार्केटमध्ये लक्झरी कार्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. अनेक सेलिब्रेटी, क्रिकेटर्स आणि उच्च वर्गीय लोक नेहमीच लक्झरी कार्सचा समावेश आपल्या कार कलेक्शन करत असतात. भारताचा स्टार क्रिकेटर आणि कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीकडे सुद्धा अनेक आलिशान कार आहे.
नुकतेच भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी झारखंडची राजधानी रांचीमध्ये Citroen Basalt Dark Edition SUV चालवताना दिसला. त्याच्या शानदार कार आणि बाईक कलेक्शनसाठी प्रसिद्ध असलेला धोनी यावेळी स्टायलिश आणि प्रीमियम एसयूव्हीसह दिसला.
महेंद्रसिंग धोनीच्या कार कलेक्शनमध्ये आधीच मर्सिडीज-बेंझ G63 AMG, निसान जोंगा आणि जीप ग्रँड चेरोकी एसआरटी सारख्या लक्झरी कार आहेत. सिट्रोएन बेसाल्ट डार्क एडिशन ही धोनीची आवडती कार बनली आहे. या कारचे खास फीचर्स, सुरक्षितता आणि किंमत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Latest.📸
Enjoying life on the streets of Ranchi.🩵pic.twitter.com/LBb42XMGOS
— Dhonism (@Dhoniismforlife) June 28, 2025
Mercedes Benz च्या कार झाल्या अजूनच महाग ! ‘या’ मॉडेल्सच्या किमतीत झाली लाखो रुपयांची वाढ
सिट्रोएन बेसाल्ट डार्क एडिशनला भारतातील NCAP क्रॅश टेस्टमध्ये 4-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे, ज्यामुळे ही कार या सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित SUV पैकी एक बनली आहे. यात 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, ट्रॅक्शन कंट्रोल आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) सारखी महत्त्वाची सेफ्टी फीचर्स आहेत. या सर्व फीचर्समुळे केवळ महामार्गांवरच नव्हे तर शहरातील रस्त्यांवरही ही कार चालवणे सुरक्षित होते. अशा परिस्थितीत, ही कार कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय बनते.
सिट्रोएन बेसाल्ट डार्क एडिशनमध्ये 10.25 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करते. याशिवाय, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि वायरलेस चार्जर सारखे फीचर्स तिला उच्च दर्जाच्या ड्रायव्हिंग अनुभवात रूपांतरित करतात. जरी त्यात सनरूफ आणि मागील खिडकीच्या शेड्ससारख्या काही प्रीमियम फीचर्सचा अभाव असला तरी, तिच्या स्मार्ट इंटिरिअरमुळे ही कार अजूनही व्यावहारिक आणि आधुनिक अनुभव देते.
1 लाखापेक्षा कमी Down Payment केल्यास Tata Punch होईल का तुमची? असा असेल संपूर्ण हिशोब
सिट्रोएन बेसाल्ट डार्क एडिशनकडे पाहिल्यास, त्याची बोल्ड आणि स्पोर्टी डिझाइन आपल्याला पहिल्या दृष्टीक्षेपात प्रभावित करते. त्यात पर्ला नेरा ब्लॅक पेंट फिनिश, डार्क क्रोम ॲक्सेंट, ब्लॅक साइड मोल्डिंग आणि ग्लॉस ब्लॅक डोअर हँडल आणि बंपर आहेत. या एलिमेंट्समुळे, ही कार सामान्य एसयूव्हीपेक्षा वेगळी दिसते आणि एक वेगळी ओळख निर्माण करते. कदाचित हेच कारण असेल की क्रिकेट सुपरस्टार एमएस धोनीने हे कार त्याच्या कार कलेक्शनमध्ये समाविष्ट केली.
सिट्रोएन बेसाल्ट डार्क एडिशनची एक्स-शोरूम किंमत 12.30 लाख रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे ती प्रीमियम परंतु स्वस्त अशी एसयूव्ही बनते. याचे डिझाइन, सेफ्टी फीचर्स आणि तंत्रज्ञान पाहता, ही किंमत ग्राहकांना परवडणारी वाटते.