फोटो सौजन्य: Gemini
भारतातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी सुझुकी त्यांच्या उत्तम बाईक आणि स्कूटरसाठी ओळखली जाते. कंपनी 250 सीसी सेगमेंटमध्ये Suzuki Gixxer 250 रेंज देखील ऑफर करते. नुकतेच कंपनीने बाईकची ही रेंज अपडेट केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Tata Punch Old vs New: जुन्या व्हर्जनपेक्षा नवीन टाटा पंच किती वेगळी आणि खास? जाणून घ्या
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार Suzuki Gixxer SF 250 आणि Gixxer 250 या दोन्ही बाईक्सना नवीन अपडेट देण्यात आले आहे. या अपडेटमध्ये नव्या रंगांच्या पर्यायांसह आकर्षक ग्राफिक्सचा समावेश करण्यात आला आहे. Gixxer SF 250 ही बाईक ग्लास स्पार्कल ब्लॅक तसेच पर्ल ग्लेशियर व्हाईट/मेटॅलिक मॅट प्रीमियम सिल्व्हर या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर Gixxer 250 साठी पर्ल ग्लेशियर व्हाईट/मेटॅलिक मॅट प्रीमियम सिल्व्हर, मेटॅलिक ट्रायटन ब्ल्यू/ग्लास स्पार्कल ब्लॅक आणि ग्लास स्पार्कल ब्लॅक असे रंगांचे पर्याय देण्यात आले आहेत.
या बाईकमध्ये कंपनीने 249 सीसी क्षमतेचे सिंगल-सिलेंडर इंजिन कायम ठेवले आहे. हे इंजिन 27.25 बीएचपीची कमाल शक्ती आणि 22 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. यासोबत सहा-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
Suzuki Motorcycle and Scooter India चे सेल्स आणि मार्केटिंग विभागाचे व्हाइस प्रेसिडेंट दीपक मुटरेजा यांनी सांगितले की, नवीन कलर पॅलेट आणि ग्राफिक्समुळे GIXXER SF 250 आणि GIXXER 250 अधिक आकर्षक दिसतात आणि त्यांच्या स्पोर्टी व्यक्तिमत्त्वात भर पडते. परफॉर्मन्स आणि प्रगत इंजिनिअरिंगचा उत्तम समन्वय साधणाऱ्या या बाईक स्पोर्टी पण आरामदायी राइडिंग अनुभव शोधणाऱ्या रायडर्ससाठी खास आहेत.
2026 मध्ये Nissan ‘या’ 3 कार सादर करणार, थियरी साबाघ यांच्यावर सोपवली नवी जबाबदारी
Gixxer 250 ची किंमत 1.81 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे, तर Suzuki Gixxer SF 250 ची किंमत 1.89 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे. ही किंमत तुमच्याजवळील शोरुमनुसार बदलू देखील शकते.






