फोटो सौजन्य: @rushlane (X.com)
भारतात विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या जातात. यात सर्वात जास्त मागणी ही एसयूव्ही सेगमेंटमधील वाहनांना असते. त्यामुळेच अनेक ऑटो कंपन्या एसयूव्हीच्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करत असतात. पण जेव्हा कधी एसयूव्ही कारचा विषय निघतो तेव्हा सर्वात पहिले महिंद्रा कंपनीचे नाव आपल्या डोळ्यांसमोर येते.
महिंद्राने देशात अनेक बेस्ट एसयूव्ही ऑफर केले आहेत. पण आता महिंद्राने त्यांच्या प्रीमियम एसयूव्ही XUV700 चा 5-सीटर व्हेरियंट बाजारातून बंद केला आहे. 7-सीटर्सची आणि विशेषतः टॉप-एंड ट्रिम्सची लोकप्रियता सतत वाढत असलेल्या ट्रेंडला लक्षात घेऊन कंपनीने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता कंपनी फक्त 6 आणि 7 सीटर व्हेरियंटवर लक्ष केंद्रित करत आहे.
खिश्याला परवडतील अशा ‘या’ सर्वात स्वस्त Electric Car देतात 400 KM ची रेंज, आजच करून टाका बुक
खरंतर, ग्राहकांची सध्याची मागणी आणि प्राधान्य लक्षात घेऊन महिंद्राने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, कंपनीने एक मोठे पाऊल उचलले होते आणि थारचे अनेक व्हेरियंट बंद केले होते.
XUV700 च्या 5-सीटर आणि 7-सीटर पर्याय महिंद्राच्या अधिकृत वेबसाइटवरून काढून टाकण्यात आल्या आहेत, ज्यामुळे 5-सीटर व्हर्जन आता विक्रीसाठी उपलब्ध नाही हे सूचित होते. आता XUV700 ची सुरुवातीची किंमत 15 लाख रुपयांपेक्षा कमी आहे (एक्स-शोरूम), परंतु ही किंमत फक्त 7-सीटर पेट्रोल मॅन्युअल व्हेरियंटसाठी लागू असणार आहे. या हालचालीमागील सर्वात मोठे कारण म्हणजे 7-सीटर व्हर्जनची वाढती मागणी आणि टॉप ट्रिम्सची वाढती लोकप्रियता. या व्हर्जन्समध्ये, ग्राहकांना अधिक फीचर्स, अधिक जागा आणि चांगला आराम मिळतो.
व्हेरियंट लाइनअपमध्ये बदल झाला असला तरी, इंजिन ऑप्शन्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. XUV700 अजूनही पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. दोन्ही इंजिन पर्याय पॉवरफुल परफॉर्मन्स आणि चांगल्या मायलेजसाठी ओळखले जातात.
Royal Enfield ने अचानक ‘या’ बाईकची थांबवली सेल्स आणि बुकिंग, जाणून घ्या कारण
XUV700 चा 5-सीटर व्हेरियंट बंद करणे हे आणखी एक संकेत आहे की या SUV चा फेसलिफ्ट व्हर्जन लवकरच भारतीय बाजारात लाँच केला जाऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार, महिंद्रा XUV700 च्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये अनेक नवीन टेक्निकल फीचर्स अधिक कम्फर्ट पर्याय आणि डिझाइन अपडेट्स समाविष्ट असू शकतात. अलीकडेच महिंद्राने या एसयूव्हीसाठी एक नवीन ब्लॅक एडिशन देखील सादर केले आहे, परंतु ते फक्त 6 आणि 7 सीटर व्हेरियंटसाठी उपलब्ध आहे. हे स्पष्ट आहे की कंपनीचे लक्ष आता पूर्णपणे मल्टी-सीटर, टॉप ट्रिम्सवर आहे.