फोटो सौजन्य: @MotorOctane (X.com)
भारतात वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे आता अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना जात प्राधान्य देत आहे. मार्केटमधील हीच वाढती मागणी पाहता, अनेक ऑटो कंपन्या आता इलेक्ट्रिक कार्सच्या तसेच स्कूटर आणि बाईकच्या उत्पादनावर विशेष लक्ष देत आहे.
इलेक्ट्रिक कार्सना मिळणारी मागणी पाहता अनेक बेस्ट कार्स ऑफर केल्या जात आहेत. यातीलच एक लोकप्रिय कार म्हणजे MG Windsor EV. भारतीय ग्राहकांनी या कारला भरघोस प्रतिसाद दिला आहे. हीच 8 महिन्यांपूर्वी लाँच झालेली इलेक्ट्रिक कार कंपनीसाठी भाग्यवान ठरली आहे. ही कार लाँच झाल्यापासून कंपनीच्या विक्रीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. एमजी मोटर इंडियाने एप्रिल 2025 मध्ये 5,829 कार्सची विक्री केल्याची माहिती दिली आहे. तर एप्रिल 2024 मध्ये विकल्या गेलेल्या 4,725 युनिट्सपेक्षा हे 23 टक्के जास्त आहे.
सप्टेंबर 2024 मध्ये लाँच झालेल्या एमजी विंडसर ईव्हीच्या मागणीत वाढ झाल्यामुळे ही विक्री वाढली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कार निर्मात्यांनी सांगितले की, लाँच झाल्यापासून विंडसर ईव्हीच्या 20000 हून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत. एमजी विंडसर ईव्ही हे एमजी मोटर इंडियाचे एक नवीन मॉडेल आहे. विंडसर ईव्ही व्यतिरिक्त, कंपन एमजी हेक्टर, हेक्टर प्लस, MG ZS EV, एमजी अॅस्टर, एमजी कॉमेट ईव्ही आणि ग्लोस्टर सारख्या अनेक लोकप्रिय कार्सची विक्री करते.
कंपनी एमजी सायबरस्टर, एम9 इलेक्ट्रिक एमपीव्ही आणि मॅजेस्टर लाँच करण्याची तयारी करत आहे. याशिवाय, विंडसर ईव्हीमध्ये मोठ्या बॅटरी पॅक असणारे व्हर्जन देखील लाँच करणार आहे, जे या महिन्यात लाँच केले जाऊ शकते.
विंडसर ईव्हीमध्ये 50.6 किलोवॅट प्रति तास युनिटचा मोठा बॅटरी पॅक मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक कारची रेंज वाढेल. एमजी विंडसर ईव्हीचे अपडेटेड व्हर्जन इलेक्ट्रिक कारच्या डायमेन्शनल फिगरमध्ये कोणताही बदल न करता येईल. परंतु, ते नवीन अलॉय व्हील डिझाइनसह येऊ शकते. भारतात एमजी विंडसर ईव्हीची सुरुवातीची किंमत ₹9.99 लाख आहे.
Bike की Maxy Scooter? निर्णयात गोंधळ चालूच? हे वाचा आणि घ्या योग्य निर्णय!
विंडसर ईव्हीच्या लांब पल्ल्याच्या व्हर्जनमध्ये 50.6 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅकची पॉवर मिळेल, जी पूर्ण चार्ज केल्यावर 460 किलोमीटरची रेंज देईल, जी एमजी झेडएस ईव्हीच्या बरोबरीची आहे. सध्याच्या मॉडेलप्रमाणे त्यात PMS मोटर असेल की नाही हे स्पष्ट नाही. सध्याच्या कॉन्फिगरेशनमध्ये, एमजी विंडसर ईव्हीवरील फ्रंट व्हील ड्राइव्ह मोटर जास्तीत जास्त 131.3 बीएचपी पॉवर आणि 200 एनएमचा पीक टॉर्क निर्माण करते. कंपनीचा दावा आहे की या एसयूव्हीचा टॉप स्पीड ताशी 175 किलोमीटर आहे. ही ईव्ही सात तासांत 20-100 टक्के चार्ज होते. तर डीसी फास्ट चार्जरने ही कार 30 मिनिटांत 30 टक्के ते 80 टक्के चार्ज करता येते.