होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाकडून स्वस्त किमतीत उत्तम परफॉर्मन्स देणारी OBD2B Shine 100 लाँच
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय)ने आज सुधारित स्टाइलिंगसह अपडेटेड ओबीडी२बी-प्रमाणिात शाइन 100 लाँच केली. नवीन 2025 होंडा शाइन 100 ची किंमत 68,767 रूपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. ही बाईक आता भारतभरातील एचएमएसआय डिलरशिप्समध्ये उपलब्ध आहे.
अपडेटेड शाइन 100 लाँच करत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी त्सुत्सुमू ओटनी म्हणाले, ”आम्हाला भारतातील ग्राहकांसाठी नवीन ओबीडी२बी-प्रमाणित शाइन १०० लाँच करण्याचा आनंद होत आहे. मार्च 2023 मध्ये लाँच झाल्यापासून शाइन 100 ने एचएमएसआयच्या मोटरसायकल पोर्टफोलिओमधील झपाट्याने विकसित होणारा ब्रँड म्हणून स्वत:चे स्थान स्थापित केले आहे.”
Honda Activa E ला टक्कर द्यायला येत आहे Suzuki E Access स्कूटर, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
नवीन शाइन 100 मध्ये भारतातील लोकप्रिय शाइन 125 मधून प्रोत्साहित आकर्षक डिझाइन स्टाइल आहे. या बाईकच्या बॉडी पॅनेल्सवर नवीन ग्राफिक्स व होंडा लोगो आहे. या बाईकमधील लक्षवेधक फ्रण्ट काऊल, ब्लॅक-आऊट अलॉई व्हील्स, व्यावहारिक अॅल्युमिनिअम ग्रॅबरेल, लांब व आरामदायी सिंगल-पीस सीट आणि स्लीक मफलर बाईकच्या स्मूद स्टाइलला अनुसरून आहेत, तसेच यामुळे दैनंदिन प्रवासातही सोयीसुविधेमध्ये वाढ होते.
शाइन 100 पाच डायनॅमिक रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आली आहे, ज्यामुळे राइडरच्या विविध पसंतींची पूर्तता होते. हे रंग आहेत ब्लॅकसह रेड, ब्लॅकसह ब्ल्यू, ब्लॅकसह ऑरेंज, ब्लॅकसह ग्रे आणि ब्लॅकसह ग्रीन. वजनाने हलके, पण टिकाऊ डायमंड-टाइप फ्रेमवर निर्माण करण्यात आलेली शाइन 100 उच्च दर्जाच्या राइड आरामदायीपणासाठी डिझाइन करण्यात आली आहे. या बाईकमध्ये टेलिस्कोपिक फ्रण्ट फोक्स आणि ट्विन रिअर शॉक अॅब्जॉबर्स आहेत, ज्यामधून विविध रस्त्यांवर स्थिरतेची खात्री मिळते.
किती वर्ष टिकते Electric Scooter ची बॅटरी? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या ‘ही’ गोष्ट
अधिक सुरक्षिततेसाठी शाइन 100 मध्ये दोन्ही बाजूस ड्रम ब्रेक्ससोबत सीबीएस आहे. या बाईकमध्ये 98.98 सीसी, सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्ड, फ्यूएल-इंजेक्टेड इंजिनची शक्ती आहे, जे आता आधुनिक उत्सर्जन नियमांची पूर्तता करण्यासाठी ओबीडी२बी-प्रमाणित आहे. हे इंजिन 7500 आरपीएममध्ये 5.43 केडब्ल्यू शक्ती आणि 5000 आरपीएममध्ये 8.04 एनएम टॉर्क देते, ज्यामधून उत्साहवर्धक व कार्यक्षम राइडची खात्री मिळते. या बाईकच्या इंजिनसोबत 4-स्पीड गिअरबॉक्स देखील जोडले आहे.
नवीन 2025 होंडा शाइन 100 ची किंमत 68,767 रूपये (एक्स-शोरूम दिल्ली) आहे. ही बाईक सिंगल व्हेरियंटसह पाच रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आली आहे. शाइन 100 आता भारतभरातील सर्व एचएमएसआय डिलरशिप्समध्ये उपलब्ध आहे.