फोटो सौजन्य: Social Media
देशात आता इलेक्ट्रिक वाहनांचे वारे जोरदार वेगाने पाहायला मिळत आहे. आजचा ग्राहक इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्राधान्य देत आहे. ग्राहकांमधील हीच वाढती मागणी पाहता अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये बेस्ट EV लाँच करत आहे. आता तर ई-बाईक सोबतच ई-स्कूटर देखील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात लाँच होत आहे.
ओला इलेक्ट्रिक तर आधीपासूनच इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादित करत आहे. पण काही महिन्यांपूर्वी होंडाने देखील E Activa मार्केटमध्ये सादर केली होती. आता याच इलेक्ट्रिक अॅक्टिव्हाला टक्कर देण्यासाठी सुझुकी मार्केटमध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे.
‘या’ लक्झरी SUV मधून आकाश अंबानी करतात प्रवास, किंमत वाचाल तर उडेल झोप
देशात इलेक्ट्रिक टू व्हिलर्सची मागणी सतत वाढताना दिसत आहे. हीच मागणी लक्षात घेऊन, वाहन उत्पादकांकडून अनेक नवीन स्कूटर आणि बाईक बाजारात आणल्या जात आहेत. आता जपानी दुचाकी उत्पादक सुझुकी लवकरच त्यांची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून सुझुकी ई-अॅक्सेस लाँच करण्याची तयारी करत आहे. त्यात कोणत्या प्रकारचे फीचर्स दिले जातील, ही स्कूटर किती रेंज देईल. या स्कूटरची किंमत किती असेल? याबाबत आज आपण जाणून घेऊया.
सुझुकी मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया लवकरच त्यांची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची तयारी करत आहे. माहितीनुसार, सुझुकी ई-अॅक्सेस लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे.
सुझुकी त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर ई अॅक्सेसमध्ये अनेक उत्तम फीचर्स दिले जातील. यात सुझुकी राइड कनेक्ट अॅप, कलरफुल TFT LCD स्क्रीन, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन, रिअल टाइम ट्रॅफिक अपडेट्स, की-फॉब, मल्टी फंक्शन स्टार्टर स्विच, इको, राइड ए, राइड बी आणि ड्रायव्हिंगसाठी रिव्हर्स मोड यासह अनेक फीचर्स दिले जातील.
किती वर्ष टिकते Electric Scooter ची बॅटरी? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या ‘ही’ गोष्ट
सुझुकी ई अॅक्सेसमध्ये 3.07 KWh प्रति तास क्षमतेची लिथियम आयन फॉस्फेट बॅटरी आहे. ही बॅटरी पोर्टेबल चार्जरने 6.42 तासांत आणि जलद चार्जरने 2.2 तासांत 0-100 टक्के चार्ज करता येते. त्याचा टॉप स्पीड ताशी 71 किलोमीटर पर्यंत आहे आणि त्यात बसवलेली बॅटरी 4 चा मायलेज देते. ही बॅटरी 1 किलोवॅटचे पॉवर आणि 15 न्यूटन मीटरचा टॉर्क प्रदान करते. पूर्ण चार्ज केल्यानंतर, ही स्कूटर 95 किमी पर्यंत चालवता येते.
सुझुकीने अद्याप स्कूटरच्या लाँचिंगबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही, परंतु पुढील तीन ते चार महिन्यांत ही स्कूटर लाँच होण्याची शक्यता आहे. ही स्कूटर कंपनीने जानेवारी 2025 मध्ये आयोजित भारत मोबिलिटीमध्ये सादर केली आहे.