फोटो सौजन्य: iStock
निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने ऑक्टोबर 2025 मध्ये एकूण 9675 युनिट्सची विक्री नोंदवली आहे. यात देशांतर्गत बाजारात 2402 युनिट्स तर निर्यातीमध्ये 7273 युनिट्स विकल्या गेल्या आहेत. ही मासिक विक्री सप्टेंबरच्या तुलनेत तब्बल 45% ने वाढली आहे. सणासुदीच्या काळात म्हणजेच नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवीन निसान मॅग्नाइट या SUV ला देशभरातून जोरदार प्रतिसाद मिळाला. या वाढीमागे सरकारच्या जीएसटी दरकपातीचाही सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.
निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स यांनी सांगितले की, “ऑक्टोबर महिना निसानसाठी अत्यंत यशस्वी ठरला. निसान मॅग्नाइट 40 सेफ्टी फीचर्सने सुसज्ज आणि GNCAP 5-स्टार रेटिंग मिळवलेली SUV ग्राहकांमध्ये अपार लोकप्रिय होत आहे. 10 वर्षांच्या विस्तारित वॉरंटीसह आणि जीएसटी लाभामुळे कमी झालेल्या किंमतींमुळे तिचे आकर्षण अधिक वाढले आहे. कुरो एडिशन आणि नवीन मेटॅलिक ग्रे व्हेरिएंटला मिळालेला प्रतिसाद आमच्या ब्रँडवरील ग्राहकांचा विश्वास अधोरेखित करतो.”
पगार 40 हजार आणि स्वप्न नवीन Mahindra Bolero खरेदी करण्याचे? ‘हा’ हिशोब लक्षात ठेवा
कंपनीने अलीकडेच आपल्या 12 लाखाव्या वाहनाच्या निर्यातीचा टप्पा गाठत “मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड” या ध्येयाशी बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली. निसानने अलीकडेच मॅग्नाइट BR10 EZ-Shift (AMT) या नव्या सीएनजी रेट्रोफिटमेंट प्रोग्रामचीही घोषणा केली आहे, ज्यामुळे ग्राहकांना अधिक फ्लेक्सिबिलिटी आणि मूल्य मिळणार आहे.
आगामी काळात निसान टेक्टॉन, 7-सीटर बी-एमपीव्ही आणि 7-सीटर सी-एसयूव्ही अशा तीन नव्या मॉडेल्सचे लाँचिंग होणार आहे. डीलर नेटवर्क विस्ताराच्या तयारीत असून, वाढत्या मागणीसाठी सज्ज आहे.
Rolls Royce सोडून Mukesh Ambani यांचा जावई फिरतोय ‘या’ कारमधून, इतकं काय आहे खास?
निसान मॅग्नाइटची किंमत जीएसटी कमी झाल्यानंतर 1 लाख रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. देशभरातील ग्राहकांकडून या SUV ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, 65+ देशांमध्ये निर्यात होणारी मेड-इन-इंडिया मॅग्नाइट निसानच्या “One Car, One World” या तत्त्वज्ञानाचे खरे प्रतीक बनली आहे.






