फोटो सौजन्य: iStock
दिल्लीत नेहमीच वायू प्रदूषणाची समस्या उद्भवत असते. याचे मोठे कारण वाहन देखील आहेत. याचाच सामना करण्यासाठी सरकारने आता एक मोठे पाऊल उचलले आहे. दिल्लीत ज्यांच्या कार 15 वर्षांपेक्षा जुन्या असतील किंवा डिझेल कार 10 वर्षांपेक्षा जुन्या असतील, तर ते लोकं 1 जुलै 2025 पासून कोणत्याही पेट्रोल पंपावरून इंधन भरू शकणार नाही. एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशन (CAQM) द्वारे ही नवीन सिस्टम लागू केली जात आहे जेणेकरून एंड-ऑफ-लाइफ (EoL) वाहने रस्त्यांवरून हटवता येतील. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
एंड-ऑफ-लाइफ (EoL) वाहने म्हणजे 15 वर्षांपेक्षा जास्त जुनी पेट्रोल वाहने आणि 10 वर्षांपेक्षा जास्त जुनी डिझेल वाहने. रजिस्ट्रेशन नुसार आता निर्धारित मर्यादा ओलांडलेल्या अशा वाहनांना ‘एंड-ऑफ-लाइफ’ घोषित करण्यात आले आहे. तसेच, अशा वाहनांचा वापर आता दिल्लीच्या हवेसाठी धोकादायक मानला जात आहे.
BMW, Jaguar सारख्या लक्झरी ब्रँड्सना ‘या’ कंपनीने चारली धूळ, धडाधड विकल्या जातात कार्स
यासाठी, ANPR कॅमेरे (Automatic Number Plate Recognition) बसवण्यात आले आहेत, जे वाहनाची नंबर प्लेट स्कॅन करतील. वाहनाचे आयुष्य, फ्युएल टाइप आणि रजिस्ट्रेशन डिटेल त्याच्या डेटाबेसशी जुळवले जातील, जर वाहन EOL असल्याचे आढळले तर पंपावर त्वरिट इंधन नाकारले जाईल.
आतापर्यंत 3.63 कोटी वाहनांचे ANPR सिस्टमद्वारे स्कॅनिंग करण्यात आले आहे. 4.90 लाख वाहनांना EOL घोषित करण्यात आले आहे. त्याच वेळी, 29.52 लाख वाहनांचे पीयूसी प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यात आले आहे आणि यातून 168 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कार खरेदी करण्याचा प्लॅन करताय? June 2025 मध्ये Google वर ट्रेंड होत आहेत ‘या’ 5 इलेक्ट्रिक कार
तुमचे वाहन EoL (End-of-Life) कॅटेगरीमध्ये आहे की नाही हे पाहण्यासाठी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) तपासा. जर तुमचे वाहन EoL (End-of-Life) मध्ये असेल तर NCR बाहेर वाहन स्क्रॅप करण्याचा किंवा नोंदणी करण्याचा विचार करा. वेळेवर PUC रिन्यू करा.
दिल्लीच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषणाच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आवश्यक मानला जात आहे. जर तुम्ही दिल्लीत राहत असाल आणि तुमचे वाहन खूपच जुने असेल तर आता बदल करण्याची वेळ आली आहे.
या नियमाची अंमलबजावणी महाराष्ट्रात होण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, जर तुमची कार End-of-Life (EoL) येत असेल तर नवीन कार घेणे गरजेचे आहे.