आली रे आली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आली ! किंमत फक्त 52,000; ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही
भारतातील झपाट्याने वाढणाऱ्या प्रीमियम इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादकांपैकी एक असलेल्या ओडीसी इलेक्ट्रिक व्हेईकल्सने आपल्या लोकप्रिय रेसर स्कूटरचे अपग्रेडेड मॉडेल ‘रेसर निओ’ नुकतेच सादर केले आहे. ही नवी इलेक्ट्रिक स्कूटर विशेषतः इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्या प्रवाशांसाठी डिझाइन करण्यात आली असून, यात सुधारित बॅटरी तंत्रज्ञान, व्यावहारिक कार्यक्षमता, आणि आधुनिक स्मार्ट फीचर्स यांचा समावेश आहे.
रेसर निओची किंमत अत्यंत किफायतशीर ठेवण्यात आली आहे. जसे की 52000 (ग्रॅफिन) व ₹63000 (लिथियम-आयन) (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. ही स्कूटर 250 वॅट मोटर आणि 25 किमी/तास स्पीडसह लो-स्पीड ईव्ही नियमांनुसार तयार करण्यात आली आहे. यामुळे ही स्कूटर ड्रायव्हिंग लायसन्स किंवा नोंदणी शिवाय वापरता येते, जी विद्यार्थी, डिलिव्हरी राइडर्स आणि प्रोफेशनल्ससाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
प्रीमियम आणि मॉडर्न लूकमध्ये दिसणार Mahindra XUV 3XO, कंपनीने नवीन टिझर केला रिलीज
ग्रॅफिन (60V, 32Ah / 45Ah)
लिथियम-आयन (60V, 24Ah)
या बॅटऱ्यांमुळे स्कूटरला एका चार्जमध्ये 90 ते 115 किमी पर्यंतची प्रमाणित रेंज मिळते. चार्जिंग वेळ 4 ते 8 तासांपर्यंत असून, दैनंदिन वापरासाठी अत्यंत सोयीस्कर आहे.
ही स्कूटर ५ आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे: फायरी रेड, लुनार व्हाइट, टायटॅनियम ग्रे, पाइन ग्रीन आणि लाइट सियान.
या लाँचबाबत ओडीसी इलेक्ट्रिकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नेमिन वोरा म्हणाले, “रेसर निओ हे आमच्या रेसर मॉडेलचे अधिक स्मार्ट आणि युजर-केंद्रित अपग्रेड आहे. आमच्या डिझाइनमध्ये आम्ही सुधारणा केल्या असून, त्यामध्ये किफायतशीरतेसोबतच राइडिंगचा अनुभवही अधिक रोमांचक करण्यात आला आहे.”
असा रेकॉर्ड पुन्हा होणे नाही ! ‘या’ चिनी Electric Car ने फक्त 3 मिनिटात मिळवली 2 लाख प्री-ऑर्डर
ही स्कूटर १५० हून अधिक डिलरशिप्स आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून भारतभर उपलब्ध आहे.
२०२० मध्ये स्थापन झालेली ओडीसी इलेक्ट्रिक ही कंपनी भारतात इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. कंपनीकडे सध्या ७ मॉडेल्सचा उत्पादन पोर्टफोलिओ असून यामध्ये: