फोटो सौजन्य- iStock
देशामध्ये दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांकडून पंसती मिळत आहे. पावसाळ्यामध्ये दुचाकींच्या मागणीमध्ये काही घट होते. त्यामुळे त्याचा परिणाम इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीवरही झाला असला तरीही पर्यावरणपुरक आणि किफायतशीर रेंज यामुळे ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. आणि सणासुदीचा काळ सुरु झाला असल्याने आता इलेक्ट्रीक दुचाकी निर्माते वाहनांच्या विक्रीमध्ये वाढ होण्याची अपेक्षा करत आहेत. जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यातील इलेक्ट्रीक दुचाकी उत्पादकांची कामगिरी
ओला इलेक्ट्रिकचे वर्चस्व कायम
ऑगस्ट महिन्यात भारतीय बाजारपेठेमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीवर ओला इलेक्ट्रिकचे वर्चस्व कायम आहे. तर टू व्हीलर्सच्या मोठ्या कंपन्या TVS, Bajaj Auto आणि इलेक्ट्रीक टू व्हीलर्सची कंपनी Ather हे 2W EV उत्पादकांच्या यादीमध्ये Ola चे अनुसरण करतात. तथापि, सर्व उत्पादकांच्या विक्री संख्येत घट झाली आहे. विक्री कमी होण्याच्या महत्त्वाच्या घटकांमध्ये सबसिडी आणि वाढत्या किमती यांचा समावेश होतो.
ओला इलेक्ट्रिक
ओला इलेक्ट्रिकने ऑगस्ट 2024 मध्ये इलेक्ट्रिक दुचाकींच्या 25,517 युनिट्सची विक्री केली आहे आणि ऑगस्ट 2023 मध्ये विकल्या गेलेल्या 18,750 युनिट्सच्या तुलनेत ही 46.76% ची वाढ आहे. तथापि, महिन्या-दर-महिना तुलनेत 33.89% ची घट झाली आहे. कंपनीने जुलै 2024 मध्ये 41,624 युनिट्सची विक्री केली होती. गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी विक्री असली तरी मागील वर्षापेक्षा ओलाची विक्री सुधारली आहे.
बजाज ऑटो
बजाज ऑटोने ऑगस्ट 2024 मध्ये चेतक इलेक्ट्रिक स्कूटरच्या 16,706 युनिट्सची विक्री केली. विक्रीत ही गेल्या वर्षीच्या तुलनेत 153.51% वाढ आहे. तरी, जुलै 2024 मधील विक्रीच्या तुलनेत विक्री 5.39% घट झाली आहे.
TVS मोटर कंपनी
TVS मोटर कंपनीने 2023 मध्ये 15,482 युनिट्सच्या तुलनेत गेल्या महिन्यात iQube इलेक्ट्रिक स्कूटरच्या 17,543 युनिट्सची विक्री केली आहे. जुलै 2024 च्या विक्रीच्या तुलनेत महिन्या-दर-महिना विक्रीत 9.97% घट झाली आहे. कंपनीने ऑगस्टच्या मध्यात iQube चे सेलिब्रेशन एडिशन लाँच केले होते.
एथर एनर्जीची मात्र दोन्ही विक्रीमध्ये वाढ
एथर एनर्जी कंपनीने ऑगस्ट 2024 मध्ये इलेक्ट्रिक दुचाकींच्या 10,830 युनिट्सची विक्री केली. वर्ष-दर-वर्षाच्या संदर्भात ही 51.32% आणि मागील महिन्याच्या तुलनेतही एथर एनर्जीच्या इलेक्ट्रीक टू व्हीलर्समध्ये 7.37% वाढ झाली आहे. Ather ने ऑगस्ट 2023 मध्ये 7157 युनिट्स विकल्या. Ather ने Ather Rizta in Care, Plus आणि Max पॅक देखील सादर केले आहेत.
हिरो मोटोकॉर्प
Hero MotoCorp ने मागील वर्षाच्या तुलनेत विक्रीच्या बाबतीत 418.25% ची वाढ नोंदवली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये निर्मात्याने फक्त 915 युनिट्सची विक्री केली होती.
भारतामध्ये इलेक्ट्रीक दुचाकी उत्पादकांमध्ये Greaves Electric, Revolt Intellicorp, KLB Komaki, Kinetic Green आणि Wardwizard यांचा ही समावेश होतो.