नवीन Tata Tigor घरी आणायची आहे? 1 लाख डाउन पेमेंटवर किती असेल EMI? खरेदीपूर्वी समजून घ्या संपूर्ण व्यवहार
टाटा कॉम्पॅक्ट सेडान कार सेगमेंटमध्ये Tigor सादर करते. या गाडीची एक्स शोरूम किंमत 5.55 लाख रुपये आहे. जर तुम्ही या गाडीची दिल्लीमध्ये खरेदी केली तर सुमारे 22 हजार रुपये आरटीओ आणि सुमारे 33 हजार रुपये इंश्योरेंससाठी खर्च करावे लागणार आहेत. त्यानंतर टाटा टिगोरची ऑन रोड किंमत सुमारे 6.10 लाख रुपये होते. (फोटो सौजन्य – Tata)
जर तुम्ही या गाडीचे बेस व्हेरिअंट खरेदी करण्याचा विचार करत असाल बँक तुम्हाला या गाडीच्या एक्स शोरूम किंमतीवर कर्ज देणार आहे. एक लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केल्यानंतर सुमारे 5.10 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागणार आहे. बँक जर तुम्हाला 9 टक्के व्याजासह सात वर्षांसाठी 5.10 लाख रुपये देत असेल तर दर महिन्याला तुम्हाला 8211 रुपये ईएमआय भरावा लागणार आहे.
जर तुम्ही 9 टक्के व्याजासह सात वर्षांसाठी बँकेकडून 5.10 लाख रुपयांचे कार लोन घेतले, तर तुम्हाला 7 वर्षांसाठी 8211 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे. त्यामुळे, सात वर्षांत, तुम्हाला टाटा टिगोरच्या बेस व्हेरिएंटसाठी व्याजापोटी अंदाजे 1.79 लाख रुपये भरावे लागतील. यानंतर, एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह तुमच्या कारची एकूण किंमत अंदाजे 7.89 लाख रुपये होईल.
टाटा टिगोर गाडी एक कॉम्पॅक्ट सेडान म्हणून सादर करते. टिगोरची थेट स्पर्धा नव्या पिढीतील मारुती डिझायर, होंडा अमेझ आणि ह्युंदाई ऑरा यांसारख्या सेडान गाड्यांसोबत केली जात आहे.






