पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे टेन्शन विसरा! (Photo Credit- X)
देशातील सर्वात स्वस्त आणि परवडणाऱ्या सीएनजी कारच्या यादीत ‘मारुति सुझुकी’ (Maruti Suzuki) कंपनीची ‘एस-प्रेसो सीएनजी’ आघाडीवर आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ४.६२ लाख रुपयांपासून सुरू होते. यात ग्राहकांना १.० लीटरचे इंजिन मिळते, जे ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार प्रति किलो सीएनजीवर ३२.७३ किलोमीटर इतके जबरदस्त मायलेज देते. शहरात दैनंदिन प्रवासासाठी आणि कमी बजेट असणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. याशिवाय, याच रेंजमध्ये कंपनीची ‘अल्टो के१० सीएनजी’ (Alto K10 CNG) देखील उपलब्ध आहे.
भारतीय कुटुंबांची पहिली पसंती असलेली ‘मारुति सुझुकी वॅगनआर’ (WagonR) तिच्या सीएनजी मॉडेलमुळे नेहमीच प्रचंड मागणीत असते. या कारची सुरुवातीची किंमत ५.८९ लाख रुपये आहे. मायलेजच्या बाबतीत ही कार देशातील सर्वोत्तम गाड्यांपैकी एक असून, ती प्रति किलो सीएनजीवर तब्बल ३४.०५ किलोमीटर धावू शकते. मोठा केबिन स्पेस, उत्तम लेगरूम आणि कमी मेंटेनन्स खर्च यामुळे वॅगनआर सीएनजी ग्राहकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.
पहिल्यांदाच कार विकत घेताय? मग ‘या’ टिप्स नक्की लक्षात ठेवा !
सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्या आणि टाटा मोटर्सचे (Tata Motors) चाहते असणाऱ्यांसाठी ‘टाटा टियागो सीएनजी’ हा एक उत्तम पर्याय आहे. या कारची सुरुवातीची किंमत ५.४९ लाख रुपये आहे. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात मॅन्युअल गिअरबॉक्ससोबतच ‘एएमटी’ (AMT – ऑटोमॅटिक) गिअरबॉक्सचा पर्यायही मिळतो, जो सहसा या बजेटमधील सीएनजी गाड्यांमध्ये पाहायला मिळत नाही. ही कार प्रति किलो सीएनजीवर २६.४९ किलोमीटर इतके मायलेज देते.
जर तुम्हाला आलिशान आणि सेडान (Sedan) प्रकारातील कार आवडत असेल, तर मारुति सुझुकीची ‘डिझायर सीएनजी’ तुमच्यासाठी परफेक्ट आहे. या कारची सुरुवातीची किंमत ८.०३ लाख रुपये असून, कंपनीच्या दाव्यानुसार ही कार प्रति किलो सीएनजीवर ३३.७३ किलोमीटर इतके शानदार मायलेज देते. लूक, कम्फर्ट आणि मायलेजचे उत्तम समीकरण या कारमध्ये पाहायला मिळते.
एसयूव्ही (SUV) गाड्यांची आवड असणाऱ्या ग्राहकांसाठी ‘टाटा पंच सीएनजी’ हा एक अतिशय आकर्षक आणि सुरक्षित पर्याय ठरत आहे. या मायक्रो-एसयूव्हीची सुरुवातीची किंमत ६.७४ लाख रुपये आहे. या कारचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये टाटाची प्रगत ‘ड्यूल-सिलेंडर तंत्रज्ञान’ (Twin Cylinder Technology) वापरण्यात आली आहे. यामुळे सीएनजी सिलेंडर असूनही गाडीमध्ये सामान ठेवण्यासाठी पुरेसा बूट स्पेस (Boot Space) मिळतो.
अखेर तो क्षण आलाच! Honda City Facelift 2026 भारतीय बाजारात लाँच… वाचा किंमत आणि फीचर्स






