फोटो सौजन्य: @ShiftingGearsIn (X.com)
भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांना जोरदार मागणी मिळत आहे. हीच वाढती मागणी पाहता, अनेक ऑटो कंपन्या देशात उत्तम कार ऑफर करत आहे. भारतीय सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडी देत आहे. यामुळे नक्कीच इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वाढ होत आहे.
पूर्वी अनेक ऑटो कंपन्या फक्त इंधनावर चालणाऱ्या कार ऑफर करत आहे. पण आता ही स्थिती बदलत आहे. इलेक्ट्रिक कार्सची वाढती मागणी पाहून अनेक कंपन्या आता इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करत आहे. देशातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी महिंद्रा देखील नवनवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही आणण्याच्या तयारीत आहे.
Nissan Motor India लवकरच भारतात 5 सीटर सी-एसयूव्ही आणि ऑल न्यू 7 सीटर बी-एमपीव्ही आणणार
आघाडीची कार उत्पादक कंपनी महिंद्रा येत्या काळात त्यांचे अनेक नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीच्या आगामी मॉडेलमध्ये महिंद्राच्या लोकप्रिय एसयूव्हीचा इलेक्ट्रिक व्हेरियंट देखील समाविष्ट असेल. याशिवाय, ग्राहकांना काही नवीन मॉडेल्स देखील पाहायला मिळतील. चला या 5 महिंद्रा इलेक्ट्रिक एसयूव्हींबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
XUV 3XO ही महिंद्रा सर्वाधिक विक्री होणाऱ्या कॉम्पॅक्ट एसयूव्हींपैकी एक आहे. आता कंपनी याचे इलेक्ट्रिक व्हेरियंट लाँच करण्याची तयारी करत आहे. महिंद्रा XUV 3X0 EV भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग दरम्यान अनेक वेळा दिसली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 3X0 EV ग्राहकांना एका चार्जवर सुमारे 400 किलोमीटरची रेंज देऊ शकते.
महिंद्रा भारतीय बाजारपेठेत INGLO प्लॅटफॉर्मवर आधारित त्यांची XEV 7e लाँच करण्याची तयारी करत आहे. एका बातमीनुसार , महिंद्रा XEV 7e या वर्षाच्या अखेरीस भारतात लाँच केली जाऊ शकते. अद्याप याबाबत कंपनीने अधिकृत माहिती दिलेली नाही. ही कार ग्राहकांना एका चार्जवर 500 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देऊ शकते.
अखेर Royal Enfield Classic 650 झाली लाँच ! एप्रिल 2025 पासून सुरु होणार डिलिव्हरी, किंमत फक्त
दुसरीकडे, कंपनी देशात त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कॉर्पिओ एसयूव्ही, तसेच बोलेरो आणि थारचे इलेक्ट्रिक व्हेरियंट लाँच करण्याची तयारी करत आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की कंपनी लवकरच या कार लाँच करू शकते. परंतु, आतापर्यंत कंपनीने याबद्दल कोणतेही अधिकृत विधान दिलेले नाही.