फोटो सौजन्य: iStock
जगभरात मार्केटमध्ये अनेक उत्तम आणि नामांकित ऑटो कंपन्या आहेत, ज्या नेहमीच आपल्या कार्समध्ये नवनवे तंत्रज्ञान समाविष्ट करत असतात. असेच एक तंत्रज्ञान टेस्लाने आपल्या आगामी कारमध्ये आणले आहे.
जगभरात टेस्लाने आपल्या हाय परफॉर्मन्स कार्समुळे चांगले नाव कमवले आहे. नुकतेच कंपनीने Driverless Car ची डिलिव्हरी केली आहे. जगात पहिल्यांदाच असे घडले आहे की, एका कारने कोणत्याही ड्रायव्हर, रिमोट कंट्रोल किंवा ऑपरेटरशिवाय फॅक्टरीतून ग्राहकाच्या घरापर्यंत प्रवास केला आहे. ही कार टेस्लाची पूर्णपणे ऑटोनॉमस इलेक्ट्रिक कार आहे, ज्याची पहिली डिलिव्हरी टेक्सासमध्ये झाली आहे. विशेष म्हणजे ही डिलिव्हरी एलोन मस्कच्या वाढदिवशी झाली आहे. चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
टेस्लाची ड्रायव्हरलेस कार प्रगत AI आधारित Full Self Driving (FSD) तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, ज्यामुळे ती ड्रायव्हरशिवाय स्वतःहून ऑपरेट होते. या तंत्रज्ञानामुळे कार ट्रॅफिक सिग्नल ओळखू शकते, समोरून पादचाऱ्यांना आणि इतर वाहनांना पाहिल्यानंतर स्वतःहून थांबू शकते आणि नंतर पुढे जाऊ शकते.
लक्झरी SUV मध्ये दिसला कॅप्टन कूल Mahendra Singh Dhoni, किमतीचा आकडा वाचूनच भुवया उंचावतील
ही ड्रायव्हरलेस कार कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय शहरातील रस्त्यांपासून महामार्गांवर स्वतःहून नेव्हिगेट करू शकते आणि वाहतूक नियमांचे पूर्णपणे पालन करू शकते. याशिवाय, लेन बदलणे, ऑटो ब्रेकिंग आणि पार्किंग सारख्या गोष्टी सुद्धा ही कार स्वतः करते.
सध्या ही टेक्नॉलॉजी भारतात उपलब्ध नाही, परंतु जर एखाद्या ग्राहकाला ही कार आयात करायची असेल तर रियर-व्हील ड्राइव्ह व्हेरिएंटची अंदाजे किंमत सुमारे 34 लाख रुपये असू शकते आणि परफॉर्मन्स व्हर्जनची किंमत सुमारे 51 लाख रुपये असू शकते. ही किंमत Toyota Fortuner किंवा Audi Q3 सारख्या प्रीमियम एसयूव्हीच्या बरोबरीची आहे, परंतु यामध्ये तुम्हाला पूर्णपणे ऑटोनॉमस ड्रायव्हिंगची सुविधा मिळते.
या कारच्या टेक्निकल फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या कारमध्ये 534 हॉर्सपॉवरची पॉवरफुल इलेक्ट्रिक मोटर आहे, जी फक्त 3.5 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग वाढवू शकते. याचा टॉप स्पीड 250 किमी/तास आहे आणि एकदा ही कार पूर्ण चार्ज झाल्यावर ती 455 किमी पर्यंत धावू शकते. यासोबतच, तिचा व्हीलबेस 4.79 मीटर, रुंदी 1.92 मीटर आणि 854 लिटरची मोठी बूट स्पेस आहे.
Mercedes Benz च्या कार झाल्या अजूनच महाग ! ‘या’ मॉडेल्सच्या किमतीत झाली लाखो रुपयांची वाढ
ही कार बनवताना, टेस्लाने प्रवाशांच्या कम्फर्ट आणि सुरक्षिततेचीही काळजी घेतली आहे. त्याच्या प्रीमियम केबिन डिझाइनमध्ये ऑल-डिजिटल कन्सोल, ऑटोपायलट सिस्टम, ग्लास रूफ आणि टचस्क्रीन कंट्रोल्स सारख्या फीचर्सचा समावेश आहे. याशिवाय, या कारला क्रॅश टेस्टिंगमध्ये हाय सेफ्टी रेटिंग देखील मिळाले आहे.
टेस्लाची ही कार सध्या अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये काम करत आहे. भारतात ही कार येण्यास वेळ लागू शकतो, परंतु एलोन मस्क यांनी आधीच संकेत दिले आहेत की टेस्ला भारतात मॅन्युफॅक्चरिंग युनिट बनवण्याची योजना आखत आहे.