फोटो सौजन्य: @MotorOctane (X.com)
दि. 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी पहलगाम येथे फिरायला आलेल्या भारतीय पर्यटकांवर हल्ला केला. यात 26 भारतीय निष्पाप भारतीय पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. यांनतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. तसेच, याचा प्रतिशोध भारत सरकार कधी घेणार? असा प्रश्न संतप्त नागरिक विचारात होते? आज त्या प्रश्नाचे उत्तर समस्त देशवासियांना ऑपरेशन सिंदूरमार्फत मिळाले आहे.
पाकिस्तानला मॉक ड्रिलमध्ये गुंतवत दि. 7 मे 2025 च्या मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने एअर स्ट्राइक करून पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उध्वस्त केले आहेत. आता या हल्ल्यानंतर, पाकिस्तान देखील प्रत्युत्तर देणार असे बोलले जात आहे. अशावेळी जर भारत आणि पाकिस्तानात युद्ध झालेच तर लष्करासाठी कोणती कार उपयुक्त ठरेल त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
ही कार दुसरी तिसरी कोणी नसून Force Gurkha आहे, जी भारतीय सैन्यानेच निवडली आहे. अलीकडेच, भारतीय लष्कराने कंपनीला सुमारे 3000 फोर्स गुरखा युनिट्सची ऑर्डर दिली आहे. फोर्स गुरखा कशामुळे खास बनते? त्याबद्दल जाणून घेऊयात.
अशी डील पुन्हा येणार नाही ! या कारचा जुना स्टॉक रिकामा करण्यासाठी कंपनी देतेय 1 लाखांची सूट
जेव्हा जेव्हा भारतीय सैन्य एखाद्या कार किंवा इतर कोणत्याही उत्पादनासाठी इतकी मोठी ऑर्डर देते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की ती कार त्यांच्या सेगमेंटमधील सर्वोत्तम कार आहे. यामागील कारण असे आहे की कोणत्याही कारची ऑर्डर देण्यापूर्वी, सैन्य कारची सखोल टेस्टिंग घेते जेणेकरून सामान्य ठिकाणांपासून युद्धक्षेत्रापर्यंत कारची क्षमता तपासता येईल. भारतीय लष्कराने अलीकडेच गोरखा फोर्सच्या 2,978 युनिट्ससाठी ऑर्डर दिली आहे.
परंतु, फोर्स मोटर्सला भारतीय लष्कराकडून वाहनांसाठी अशी ऑर्डर मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. ही नवीन ऑर्डर लष्करासोबतच हवाई दलाच्या गरजा देखील पूर्ण करणार आहे. नवीन फोर्स गुरखा एसयूव्हीची किंमत 16.75 लाख रुपयांपासून सुरू होते. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू देखील शकते.
‘या’ भन्नाट फीचर्समुळेच तर MG Windsor EV Pro इतर इलेक्ट्रिक कारपेक्षा वेगळी ठरते
कंपनीच्या गुरखा लाईट स्ट्राइक व्हेईकल (LSV) चाही यापूर्वी सैन्यात समावेश करण्यात आला आहे. फोर्स गुरखा एसयूव्हीला सर्वात खास बनवणारी गोष्ट म्हणजे याची ताकद. या कारमध्ये आपल्याला ऑफ-रोड क्षमता, सर्व प्रकारच्या भूप्रदेशाशी जुळवून घेण्याची क्षमता आणि टिकाऊपणा पाहायला मिळेल. सैन्याच्या गरजेनुसार, या कारचा ग्राउंड क्लिअरन्स 233 मिमी असेल. याशिवाय, सैन्याच्या गरजेनुसार आणखी अनेक कस्टमायझेशन केले जातील.
ही एसयूव्ही खोलवर पाण्यात देखील सुरळीत चालू शकते म्हणूनही लष्कराची या कारला पसंती आहे. यात 700 मिमी पर्यंत वॉटर-वेडिंग क्षमता आहे. ही कार एअर इनटेक स्नॉर्कलसह येते, जे त्याची ताकद आणखी वाढवते.