फोटो सौजन्य: iStock
देशात अनेक बेस्ट इलेक्ट्रिक कार ऑफर केल्या जात आहेत. वाढत्या इंधनाच्या किंमतीमुळे ग्राहक देखील आता इलेक्ट्रिक वाहनांना इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा जास्त प्राधान्य देत आहे. तसेच Evs चा मेंटेनन्स कॉस्ट हा पेट्रोलवर चालणाऱ्या कार पेक्षा कमी असतो. म्हणूनच देशात इलेक्ट्रिक कार्सची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे.
भारतात अनेक कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट इलेक्ट्रिक कार ऑफर करतात. टाटा मोटर्स ही त्यातीलच एक कंपनी आहे. आजही मार्केटमध्ये टाटाच्या इलेक्ट्रिक कार्सना दमदार मागणी मिळताना दिसते. पण आता कंपनी आपल्या काही Electric Cars वर दमदार डिस्काउंट देत आहे.
‘हे’ 5 संकेत दिसताच समजून जावा की बाईकचा क्लच प्लेट झाला खराब
मे 2025 मध्ये टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक कारवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. यामध्ये Tata Curve EV, Punch EV, Nexon EV आणि Tiago EV यांचा समावेश आहे. टाटा मोटर्सने ईव्ही रेंजवर 1.86 लाख रुपयांपर्यंतची डिस्काउंट ऑफर जाहीर केली आहे. 2 लाख इलेक्ट्रिक कार विकल्यानंतर कंपनीने ही घोषणा केली आहे. या ऑफरअंतर्गत, कंपनी 50,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बेनिफिट आणि इन्स्टॉलेशनसह मोफत होम चार्जर देत आहे. लोकांना 6 महिने मोफत चार्जिंग देखील मिळत आहे.
या ऑफरमध्ये शून्य डाउन पेमेंट आणि 100 टक्के ऑन-रोड फायनान्सिंग देखील समाविष्ट आहे. टाटा मोटर्सच्या सर्व इलेक्ट्रिक कार दोन बॅटरी पॅकसह उपलब्ध आहेत. मे 2025 मध्ये TATA.ev कारवर किती सूट उपलब्ध आहे, त्याद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
मे 2025 मध्ये, टाटा कर्व्ह ईव्हीवर 1.71 लाख रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. ही कार सप्टेंबर 2024 मध्ये लाँच झाली होती, जी टाटा मोटर्सची लेटेस्ट ईव्ही कार आहे. भारतीय मार्केटमध्ये, टाटा कर्व्ह ईव्हीची एक्स-शोरूम किंमत 17.49 लाख ते 22.24 लाख रुपये आहे.
मे 2025 मध्ये, टाटा नेक्सॉन ईव्हीवर 1.41 लाख रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. ही भारतीय मार्केटमध्ये विकल्या जाणाऱ्या सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक कारपैकी एक आहे. भारतात, टाटा नेक्सॉन ईव्हीची एक्स-शोरूम किंमत 12.49 लाख ते 17.19 लाख रुपये आहे.
मे 2025 मध्ये, टाटा पंच ईव्हीवर 1.20 लाख रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. ही टाटाच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक कारपैकी एक आहे. भारतात टाटा पंच ईव्ही 9.99 लाख ते 14.29 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.
Honda च्या ‘या’ बाईकमध्ये आता मिळणार पहिल्यापेक्षा जास्त मायलेज, नवीन फीचर्स देखील समाविष्ट
अलिकडच्या काळात ही देशातील सर्वात किफायतशीर इलेक्ट्रिक कारपैकी एक आहे. मे 2025 मध्ये, टाटा टियागो ईव्ही इलेक्ट्रिक हॅचबॅकवर 1.30 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. ही कार अलिकडेच अपडेट देखील करण्यात आली आहे. भारतीय मार्केटमध्ये, टाटा टियागो ईव्हीची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख ते 11.14 लाख रुपये आहे.