फोटो सौजन्य: Gemini
भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केट वेगाने वाढत असताना Yamaha Aerox-E, New-Gen Bajaj Chetak आणि Ather EL हे तीन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहेत. हे तिन्ही स्कूटर्स उत्तम टेक्नोलॉजी आणि 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीचे असेल अशी अपेक्षा आहे. चला, या तिन्ही स्कूटर्सबद्दल जाणून घेऊया.
Royal Enfield Super Meteor 650 खरेदी करण्यापूर्वी डोक्यात ‘या’ गोष्टी फिट करून घ्या
Yamaha Aerox-E विशेषतः स्पोर्टी लुक आणि उत्तम परफॉर्मन्स आवडणाऱ्या रायडर्ससाठी डिझाइन केला आहे. यात 9.4 kW चा मिड-माऊंटेड इलेक्ट्रिक मोटर देण्यात आला आहे, जो 48 Nm टॉर्क निर्माण करतो. दोन रिमूवेबल बॅटऱ्यांसह मिळून एकूण 6 kWh बॅटरी क्षमता मिळते आणि ती सुमारे 106 किमी रेंज देते.
स्कूटरमध्ये 3 रायडिंग मोड्स, Eco, Standard आणि Power दिले आहेत. याशिवाय Boost Mode जलद ओव्हरटेक करण्यात मदत करतो. फ्रंट टेलिस्कोपिक फोर्क, रिअर ट्विन शॉक्स आणि ABS सह ड्युअल डिस्क ब्रेक्स राइडला अधिक स्टेबिलिटी देतात. TFT डिजिटल कन्सोलमध्ये ब्लूटूथ, नेव्हिगेशन, राइड ॲनालिटिक्स आणि OTA अपडेट्सची सुविधाही आहे.
क्रिकेटर Shafali Verma ने खरेदी केली आलिशान Electric Car, किंमत 75 लाखांपासून सुरु
Bajaj Chetak हे नाव भारतात वर्षानुवर्षे लोकप्रिय आहे आणि आता या स्कूटरचा नवीन जनरेशन इलेक्ट्रिक अवतारीत लवकरच बाजारात येत आहे. हे मॉडेल एंट्री-लेव्हल सेगमेंट लक्षात घेऊन तयार केले गेले आहे.
स्कूटरमध्ये Oval LED हेडलॅम्प, इंटीग्रेटेड DRL, नवीन LCD इंस्ट्रुमेंट क्लस्टर आणि सिंगल-यूनिट LED टेललाइट दिली जाईल. खर्च कमी ठेवण्यासाठी यात हब-माउंटेड मोटर सेटअप असेल. यात 3 kWh ते 3.5 kWh बॅटरी पॅक मिळेल, ज्यामुळे 123 ते 150 किमी रेंज मिळू शकते. याची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.
Ather EL हा एक फॅमिली-ओरिएंटेड इलेक्ट्रिक स्कूटर असेल. याची किंमत 90 हजार ते 1 लाख रुपये दरम्यान असू शकते. हा स्कूटर 2–5 kWh बॅटरी सपोर्ट करेल आणि 100 ते 150 किमी रेंज देईल. यात हलके मटेरियल, लांब सर्विस इंटरवल आणि AI-आधारित स्मार्ट कनेक्टिव्हिटी मिळेल.
Ather या मॉडेलच्या मदतीने North आणि Central India मध्ये आपली पकड मजबूत करणार आहे. तसेच त्यांनी 700+ स्टोर्स उघडण्याची योजना आखली आहे. हा स्कूटर Ola S1 आणि Bajaj Chetak सारख्या मॉडेल्सना जोरदार टक्कर देईल.






