फोटो सौजन्य : गुगल
विजय थलपती यांच्या कार कलेक्शनमध्ये अनेक अलिशान गाड्यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार थलपथी विजय यांच्या मालकीची लेक्सस एलएम ३५०एच (Lexus LM 350h) आहे. ही गाडी पूर्णपणे आरामदायी अशी असून एकदम रिच लुक देते. सुमारे 2.20 कोटी रुपये किंमत असलेली ही लक्झरी एमपीव्ही (MPV) थलपतींच्या कलेक्शनमध्ये आहे. या गाडीचं वैशिष्ट्यं म्हणजे यात 2.5 लिटर पेट्रोल-हायब्रीड इंजिन आहे. ज्यामुळे ही गाडी सर्वात लांबचा प्रवास आरामात पार पडते. मोठ्या48-इंच डिस्प्ले आणि अल्ट्रा-प्रीमियम सीटिंगसारख्या वैशिष्ट्यांमुळे, आतून ही गाडीपेक्षा एखाद्या खाजगी लाउंजसारखी वाटते.
BMW 5 सिरीज
मिळालेल्या माहितीनुसार, विजय थलपती यांच्याकडे BMW 5 सिरीज देखील आहे. 74.80 लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या किमतीसह, ही गाडी 2.0 लिटर Mild-hybrid पेट्रोल इंजिनसह येते. ही गाडी आरामदायी ड्रायव्हिंग आणि प्रीमियम इंटिरियर्ससाठी ओळखली जाते, ज्यामध्ये Curved display, ambient lighting आणि a great sound system यांचा समावेश आहे.
BMW i7
थलपतींच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका गाडीचा समावेश आहे ती म्हणजे BMW i7. या गाडीची किंमत सुमारे 2.5 कोटी रुपये आहे. याच्या फिचर्सबद्दल बोलायचं तर जबरदस्त परफॉर्मन्स बरोबरच थिएटर स्क्रीन, ॲम्बियंट लायटिंगमुळे कमाल अनुभव मिळतो.
TVS Motor Company : 8% वाढ! दुचाकी विक्री 4.55 लाख युनिट्सवर… इतकी झाली एकूण वाहनांची विक्री
Toyota Wellfire
मिळालेल्या काही माहितीनुसार, जेव्हापासून विजय थलपती यांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हापासून , Toyota Wellfire ही विजय यांची आवडती गाडी आहे. सुमारे 1.19 कोटी रुपयांपासून सुरू होणारी ही गाडी सेलिब्रिटी आणि राजकीय नेते मंडळींमध्ये खूप लोकप्रिय आहे. याचं कारण म्हणजे आरामदायक सीट्स, 2.5-लिटर हायब्रीड पेट्रोल इंजिन आणि भरपूर जागा यामुळे ही गाडी शहरातील लांबच्या प्रवासासाठी सोयीस्कर ठरते.
Maruti Swift
विजय थलपतींच्या गॅरेजमधील सर्वात आणखी एका कारचा समावेश आहे ती म्हणजे Maruti Swift. थलपती या गाडीतून अनेकदा निवडणुकीच्या काळात दौऱ्यावर जाताना दिसले. या गाडीत 1.2 -लिटर पेट्रोल इंजिन असून ही कार दैनंदिन वापरासाठी उत्तम आहे.
Rolls-Royce Ghost
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजय यांच्या मालकीची पूर्वी Rolls-Royce Ghost होती. जी विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. या गाडीबाबत सांगायचं तर 6.6-लिटर ट्विन-टर्बोचार्ज्ड V12 इंजिन होते, यामध्ये 8-Speed ZF, Automatic transmission आणि Rear-wheel drive असून, त्यामुळे ही गाडी सुमारे 4.8 सेकंदात 0-60 मैल प्रति तास वेग गाठू शकत होती. 2009 ते 2014 दरम्यान मार्केटला आलेली Rear-wheel drive सुमारे 2कोटी रुपयांना उपलब्ध होती.
काय सांगता! अमेज, एलीवेट आणि सिटी कार्सवर बंपर ऑफर; 2 लाखांहून अधिक सवलत






