फोटो सौजन्य: iStock
भारतात नवनवीन कार लाँच होताना दिसत आहे. मात्र, आजही अनेक जण जुन्या कार वापरताना दिसतात. कित्येकदा मार्केटमध्ये एकदा कार जुनी झाली की त्याचे पार्ट्स मार्केटमध्ये मिळत नाही. अशातच आता एक नवीन प्रश्न विचारला जातो तो म्हणजे E20 फ्युएल जुन्या वाहनांमध्ये वापरले जाऊ शकते का?
सध्या सोशल मीडियावर E20 फ्युएलबद्दल खूप चर्चा सुरू आहे. लोकांना प्रश्न पडत आहे की जर हे नवीन इंधन त्यांच्या जुन्या वाहनात टाकले तर इंजिन खरंच खराब होईल का? मात्र, खरी गोष्ट ही आहे की E20 हे अजिबात नवीन नाही. दिल्ली-एनसीआर सारख्या मोठ्या शहरांमध्ये, लोक बर्याच काळापासून नकळत ते वापरत आहेत.
Mahindra XUV 3XO RevX A ला मिळाला ‘हा’ नवीन फिचर, आता प्रवास होणार अधिकच मजेदार
एप्रिल 2023 नंतर बनवलेली सर्व वाहनं E20 वर चालण्यासाठी बनवल्या जातात. अनेक मोठ्या कंपन्या आधीच E20-तयार वाहनं बनवत होत्या. त्यामुळे नवीन वाहनांसाठी यात कोणतीही समस्या नाही.
जर तुमची कार 10 वर्षे जुनी असेल आणि E10 म्हणजेच 10% इथेनॉल इंधनावर चालण्यासाठी बनवली असेल, तर त्यात E20 टाकल्याने कोणतेही मोठे नुकसान होणार नाही. फरक एवढाच असेल की यामुळे वाहनाचे मायलेज थोडे कमी होऊ शकते, परंतु त्याचा इंजिनवर तात्काळ कोणताही वाईट परिणाम होणार नाही. मात्र, जर वाहन 2015 पूर्वी बनवले असेल, तर हळूहळू इंजिनवर थोडासा परिणाम होऊ शकतो. असो, जुन्या वाहनांमध्ये, कालांतराने इंजिन आणि पार्ट्सची झीज होणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे.
२ लाखांचं डाउन पेमेंट आणि हातात असेल Mahindra Bolero Neo ची चावी, किती असेल EMI?
जर तुम्ही E20 फ्युएल वापरत असाल, तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या वाहनाची नियमित सर्व्हिसिंग. तुम्हाला कारची सर्व्हिस पूर्वीपेक्षा थोडी लवकर करावी लागू शकते. प्रत्येक ब्रँड आणि मॉडेलमध्ये त्याचा परिणाम बदलू शकतो, परंतु जर तुम्ही तुमच्या वाहनाला चांगले मेंटेन ठेवले तर त्यात कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही.
लक्षात घ्या, E20 फ्युएल जुन्या कारसाठी तितके धोकादायक नाही जितके लोक मानतात. जर तुमची कार 10 वर्षे जुनी असेल तर तुम्ही ती आरामात चालवू शकता. फक्त वेळोवेळी सर्व्हिसिंग आणि योग्य मेंटेनन्स करण्याचे लक्षात ठेवा.