फोटो सौजन्य: Gemini
Honda Activa 125 ही भारतीय बाजारातील सर्वात विश्वासार्ह स्कूटर मानली जातो. याचा बेस व्हेरिएंट सुमारे 89,000 (एक्स-शोरूम) रुपयांमध्ये मिळतो. हलक्या वजनामुळे ही स्कूटर चालवायला खूप सोपी आहे. स्मूथ राइड, कमी मेंटेनन्स आणि चांगल्या किमतीमुळे ही ऑफिस-कम्युटर्ससाठी उत्तम पर्याय आहे.
Suzuki Access 125 आपल्या दमदार 124cc इंजिन आणि स्मूथ राइडसाठी लोकप्रिय आहे. 77,684 (एक्स-शोरूम) किंमतीत ही स्कूटर वेगवान एक्सेलरेशन, आरामदायी राइड आणि चांगल्या माइलेजचा उत्तम समतोल देते. हलक्या वजनामुळे ही स्कूटर शहरात चालवणे अधिक सोपे होते.
TVS Jupiter 125 ही त्यांच्यासाठी योग्य पर्याय आहे ज्यांना आरामदायी राइड, चांगली सीटिंग आणि किफायतशीर किंमत हवी आहे. जवळपास 75,600 रुपयांपासून सुरू होणारी ही स्कूटर खास फॅमिली यूजसाठी डिझाइन केलेला आहे आणि डेली कम्यूटसाठी परिपूर्ण आहे.
2026 चे नवीन वर्ष ‘या’ Electric SUVs साठी ओळखले जाणार, फटाफट होईल लाँच
TVS Ntorq 125 ही आपल्या स्पोर्टी लुक आणि पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. 80,900 किंमतीत मिळणाऱ्या या स्कूटरमध्ये 124.8cc इंजिन, फ्रंट डिस्क ब्रेक, मजबूत फ्रेम आणि प्रशस्त स्टोरेज स्पेस मिळते. स्पोर्टी राइड आवडणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
Honda Dio 125 आपल्या स्पोर्टी डिझाइन, हलक्या वजन आणि चांगल्या राइड क्वालिटीमुळे तरुणांमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत आहे. 85,433 किंमतीत मिळणारी ही स्कूटर 123.92cc इंजिनसह चांगली पॉवर आणि सुमारे 47 kmpl माइलेज देते. वजन फक्त 105 kg असल्याने ही स्कूटर हँडलिंग करण्यासाठी खूपच सोपी ठरते.






