फोटो सौजन्य: @Xroaders_001 (X.com)
भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम कार आहेत, ज्या मध्यम वर्गीय व्यक्तींसाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत. खरंतर मध्यम वर्गीय व्यक्ती कार खरेदी करताना दोन गोष्टींकडे जास्त लक्ष देतो. पहिली गोष्ट म्हणजे मायलेज आणि दुसरी म्हणजे किंमत. ग्राहकांची हीच आवश्यकता लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक बजेट फ्रेंडली कार ऑफर करत असतात.
मारुती सुझुकीने देखील मार्केटमध्ये अनेक उत्तम आणि बजेट फ्रेंडली कार ऑफर केल्या आहेत. यात सर्वात जास्त डिमांड ही डिझायर कारला असते. जर तुम्हीही कमी बजेटमध्ये जास्त मायलेज असलेली आणि चांगली फीचर्स असलेली कार शोधत असाल, तर मारुती डिझायर तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो. ही 5-स्टार सेफ्टी रेटेड कार देखील आहे. चला या कारची ऑन-रोड किंमत, EMI आणि डाउन पेमेंटबद्दल जाणून घेऊयात. तसेच, तुम्ही ही कार किती पगारावर खरेदी करू शकता त्याबद्दलही जाणून घेऊयात.
कोणत्या राज्यात EV खरेदीवर मिळतेय सर्वाधिक सूट? महाराष्ट्रात ‘या’ बाबतीत 100 टक्के सूट
मारुती डिझायरची एक्स-शोरूम किंमत 6.84 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 10.19 लाख रुपयांपर्यंत जाते. मारुती डिझायरच्या बेस मॉडेल LXi ची ऑन-रोड किंमत 7.65 लाख रुपये आहे. जर तुम्हाला ही कार एकाच वेळी पूर्ण पेमेंट करून खरेदी करायची असेल, तर तुम्ही ती खरेदी करू शकता, परंतु जर तुमच्याकडे सध्या पूर्ण पैसे नसतील आणि तुम्हाला तरी देखील कार खरेदी करायची असेल, तर तुम्ही ही कार लोनवर देखील खरेदी करू शकता.
मारुती डिझायरसाठी तुम्हाला 81,300 रुपये डाउन पेमेंट करावे लागेल, त्यानंतर कारच्या चाव्या तुमच्या हातात येतील. या लोनवर बँक निश्चित व्याज आकारेल, त्यानुसार तुम्हाला दरमहा निश्चित रक्कम ईएमआय म्हणून जमा करावी लागेल.
जर तुम्ही मारुती डिझायर खरेदी करण्यासाठी तीन वर्षांसाठी कर्ज घेतले आणि बँक या कर्जावर 9 टक्के व्याज आकारत असेल, तर दरमहा 21,750 रुपये ईएमआय बँकेत जमा करावे लागेल. जर तुम्ही ही कार खरेदी करण्यासाठी चार वर्षांसाठी कर्ज घेतले तर दरमहा 17 रुपयांचा हप्ता 9 टक्के व्याजदराने बँकेत जमा करावा लागेल.
18 कॅरेट सोन्याने मढवलेल्या ‘या’ कारचा विषयच हार्ड! James Bond च्या चित्रपटाशी आहे खास कनेक्शन
जर तुम्ही मारुती डिझायरसाठी पाच वर्षांसाठी लोन घेतले तर दरमहा 14,200 रुपयांचा EMI जमा करावा लागेल. जर तुम्ही 6 वर्षांच्या लोनवर डिझायर खरेदी केली तर तुम्हाला 9 टक्के व्याजदराने 12,300 रुपयांचा EMI भरावा लागेल. अशा परिस्थितीत, तुमचा पगार 40 ते 50 हजार असला तरी तुम्ही ही कार सहज खरेदी करू शकता.