जगातील पहिली ऑटोनॉमस इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर भारतात लाँच (Photo Credit- X)
Autonomous Three Wheeler: इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणारी कंपनी ओमेगा सेकी मोबिलिटी (OSM) ने जगातील पहिली ऑटोनॉमस (चालकविरहित) इलेक्ट्रिक तीन चाकी “स्वयंगती” लाँच केली आहे. या वाहनाची शोरूम किंमत केवळ ४ लाख रुपयांपासून सुरू होते. ओएसएमच्या इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्म आणि एआय-आधारित ऑटोनॉमस सिस्टिमवर ही थ्री-व्हीलर तयार करण्यात आली असून ती आता व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध आहे.
“स्वयंगती” हे वाहन कमी अंतराच्या वाहतुकीसाठी डिझाइन केले आहे. त्यामुळे विमानतळे, स्मार्ट कॅम्पस, औद्योगिक क्षेत्रे, मोठी गृहसंकुले आणि गर्दीच्या शहरी भागांमध्ये हे वाहन चालकाशिवाय चालवता येईल. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे वाहन पूर्व-निर्धारित मार्गाचे नकाशे (Pre-Determined Routes) तयार करते. यामुळे प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर सुरक्षित आणि सहजतेने पोहोचवणे शक्य होते.
Swayamgati – World’s First Autonomous Electric 3W Priced at ₹4 Lakhs https://t.co/PMLqnWujI1 pic.twitter.com/LzUCpCVNuu — GaadiKey (@GaadiKey) September 30, 2025
२०२५ च्या मॅककिन्सेच्या अहवालानुसार, २०२३ पर्यंत जागतिक स्वायत्त वाहनांची बाजारपेठ ६२० अब्ज डॉलरपेक्षा अधिक होईल. या पार्श्वभूमीवर, ‘स्वयंगती’ हे भारतात तयार झालेले पहिले उत्पादन आहे, जे केवळ या वाढत्या ट्रेंडचा भागच नाही, तर त्याचे नेतृत्वही करेल. भारतासारख्या देशात, जिथे वाहतूक आणि शेवटच्या टप्प्यापर्यंतची कनेक्टिव्हिटी मोठी आव्हाने आहेत, तिथे हे तंत्रज्ञान एक सुरक्षित आणि परवडणारा उपाय म्हणून समोर आले आहे.
ओएसएमचे संस्थापक आणि अध्यक्ष, उदय नारंग म्हणाले की, “‘स्वयंगती’ हे केवळ एक उत्पादन नसून, भारताच्या वाहतूक भविष्याला आकार देण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. स्वायत्त वाहने आता स्वप्न नसून, आजची गरज आहेत. ‘स्वयंगती’ने हे सिद्ध केले आहे की एआय आणि लिडार (LIDAR) सारख्या प्रगत तंत्रज्ञानाची निर्मिती परवडणाऱ्या दरात भारतात शक्य आहे.”
AVAS प्रणाली आता इलेक्ट्रिक वाहनांना अनिवार्य; रस्ते सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय
ओएसएमचे मुख्य धोरण अधिकारी, विवेक धवन म्हणाले, “आमचे ध्येय स्वायत्ततेला सर्वांसाठी सुलभ बनवणे (लोकशाहीकरण) आहे.” ‘स्वयंगती’ ने हे दाखवून दिले आहे की ईव्ही उद्योगातील बुद्धिमान प्रणाली आता दैनंदिन वाहतुकीचा भाग बनू शकतात.
‘स्वयंगती’ने नुकतीच ३ किलोमीटर लांबीचा एक स्वायत्त मार्ग चाचणी कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. यामध्ये सात नियोजित थांबे, अडथळे ओळखणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची वैशिष्ट्ये समाविष्ट होती. हे सर्व चाचण्या चालकाशिवाय पूर्ण करण्यात आल्या. आता कंपनी दुसऱ्या टप्प्यात व्यावसायिक उत्पादनासाठी सज्ज झाली आहे.