ग्राहकांसाठी आलिशान कलेक्शन! ऑडी इंडियाचा AJIO LUXE सोबत सहयोग
मुंबई : ऑडी इंडियाने देशभरातील ग्राहक, उत्साही व ब्रँडशी निष्ठावान व्यक्तींकरिता ऑडी कलेक्शन आणण्यासाठी भारतातील आघाडीचा लक्झरी प्लॅटफॉर्म अजिओ लक्ससोबत सहयोग केला आहे. सणासुदीचा काळ सुरू असताना हे कलेक्शन महत्त्वाकांक्षी ग्राहकांना प्रीमियम जीवनशैली निवडींसह सण साजरे करण्याची संधी देते, ज्या ऑडीच्या प्रगतीशील डिझाइन तत्त्वांना दैनंदिन जीवनामध्ये आणतात.
या कलेक्शनमध्ये अॅक्सेसरीज, प्रीमियम कलेक्टिबल्स आणि अचूकरित्या डिझाइन केलेल्या लघुचित्रांमधील ३०हून अधिक जीवनशैली उत्पादने आहेत. ज्यांच्यामध्ये ऑडीची प्रख्यात डिझाइन शैली आणि दैनंदिन आकर्षकतेचे संयोजन आहे. किंमत ३,००० रूपयांपासून सुरू होण्यासह या श्रेणीमध्ये कार्यक्षमता-प्रेरित डिझाइन व कारागिरीचे मिश्रण आहे, ज्यामुळे महानगर शहरांमधील महत्त्वाकांक्षी ग्राहकांसाठी आलिशान सुविधा अधिक उपलब्ध होतात.
अजिओ लक्सची देशभरातील पोहोच आणि विनासायास डिजिटल-केंद्रित उपलब्धतेसह ऑडी व अजिओ लक्स यांच्यामधील सहयोग खात्री घेतो की, आलिशान सुविधा आता फक्त निवडक शहरांपर्यंत मर्यादित राहणार नाहीत. त्याऐवजी, हा सहयोग संपूर्ण भारतातील ग्राहकांना जीवनशैली प्रतीक म्हणून सुधारित, प्रगतीशील व आत्मविश्वासाने परिपूर्ण ऑडीचा अनुभव घेण्यास सक्षम करतो.
कलेक्शनच्या वैशिष्ट्यांमध्ये व्यवसाय श्रेणीत व्यावसायिकांसाठी डिझाइन करण्यात आलेल्या सुधारित अॅक्सेसरीज, ज्यामध्ये आकर्षकता व कार्यक्षमतेचे संयोजन आहे. कॅज्युअल श्रेणीत दैनंदिन आत्मविश्वासासाठी सनग्लासेस, कॅप्स व बॅग्ज अशा विविध अॅक्सेसरीजच्या माध्यमातून आरामदायीपणाचा अनुभव आहे. अॅक्टिव्ह श्रेणीत गतीशील जीवनशैली व गतीशीलतेसाठी डिझाइन केलेले टिकाऊ आणि वैविध्यपूर्ण गिअर आहे. ऑडी स्पोर्ट श्रेणीत कार्यक्षमता-प्रेरित डिझाइन, ज्यामधून ऑडीचा मोटरस्पोर्ट डीएनए दिसून येतो आणि लघुचित्रे श्रेणीत अचूकरित्या डिझाइन केलेले मॉडेल्स, जे ऑडीच्या दिग्गज वेईकल्सच्या उत्साहाला व्यापून घेतात. ऑडी कलेक्शनमधून ब्रँडचे तत्त्व निदर्शनास येते, ते म्हणजे स्टाइल कार्यक्षमतेचे विस्तारीकरण आहे, जे महत्त्वाकांक्षी ग्राहकांना गतीशीलतेच्या पलीकडे जाणाऱ्या सुधारित जीवनशैली निवडी देते.
पूर्वी रिलायन्स एसबीआय कार्डधारकांना खरेदीवर खर्च केलेल्या प्रत्येक ₹१०० साठी ५ पॉइंट्स मिळत होते, तर नियमित कार्डधारकांना प्राइम कार्ड असलेल्यांना १० पॉइंट्स मिळत होते. तथापि, १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणाऱ्या नवीन नियमांनुसार, हे पॉइंट्स दुप्पट करण्यात आले आहेत. याचा थेट फायदा अजिओ आणि जिओमार्टद्वारे दररोज खरेदी किंवा फॅशन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना होतो. सणासुदीच्या काळात, जेव्हा खरेदीचे बजेट नेहमीपेक्षा जास्त वाढते, तेव्हा हा बदल कार्डधारकांसाठी आणखी फायदेशीर ठरेल.