फोटो सौजन्य - Social Media
व्यवसाय सुरु करण्याचा विचार करताय? तर यासाठी संशोधन करणे आवश्यक असते. आपण कोणत्या क्षेत्रात राहतो? तेथील हवामान काय? तेथील लोकांची मागणी काय आहे? या सगळ्या गोष्टी तपासणे फार महत्वाचे असते. उन्हाळ्यात फॅशन स्टोअर खुले करणे मोठे फायद्याचे ठरू शकते. हिवाळ्यात वापरात असलेले कपडे उन्हळ्यात बदलले जातात. हिवाळ्यात लोकं थंडीपासून बचावाकरिता गरम कपड्यांचा वापर करतात. पण उन्हाळा सुरु होताच काही महिन्यांकरिता हे कपडे कपाटाच्या कोणत्यातरी कोपऱ्यात पडून जातात. या वेळेचा आपण फायदा घेत आपल्या नव्या व्यवसायाची संकल्पना आखू शकतो. पण हे फॅशन स्टोअर उभारताना काही चुका आहेत, त्या टाळल्या पाहिजेत. चला तर मग जाणून घेऊयात ‘या’ चुकांविषयी:
जर तुम्ही फॅशन स्टोअर खुले करता आहात, तर दुकानात गरम कपडे ठेवू नका. बाहेरचे वातावरण पहा. उन्हाळा सुरु झालाय त्यामुळे लोकं अशा कपड्यांकडे बिलकुल आकर्षित होणार नाही आहेत. या वातावरणात सुती कपडे तसेच इतर हलक्या कपड्यांची विक्री जास्त होत असते, त्यामुळे अशा कपड्यांच्या कलेक्शन करण्यावर भर द्या. तुमच्या स्टोअरमध्ये एकाच प्रकारचे कपडे ठेऊ नका. कपड्यांमध्ये Variety असल्या पाहिजेत. वेगवेगळे ब्रॅण्ड्स ठेवा. वेगवेगळी स्टाईल ठेवा. मुळात, नव्या स्टाईलवर जास्त लक्ष देत चला.
जर तुम्ही दुकानात फक्त कपडेर ठेवण्याचा विचार करत आहात तर चुकी करताय. असा विचार करा की तुमच्या दुकानात एखादा ग्राहक आला तर त्याला इतर दुकाने फिरण्याची वेळच येणार नाही. त्यामुळे कपड्यासहित, टोपी, चष्मा आणि स्कार्फ ठेवा, जेणेकरून तुमच्या स्टोअरकडे आणखीन ग्राहक आकर्षित होतील. तुम्ही फक्त ऑफलाईन साम्रगी विकण्याचे ठरवत आहात तर तुम्ही चुकताय! आजकाल ऑनलाईन माध्यमातून नफा जास्त कमावला जात आहे. तुम्ही तुमच्या स्टोअरची ऑनलाईन जाहिरात करा. तसेच ऑनलाईन साम्रगी विकण्याचाही प्रयास करत चला.
अनेक विक्रेत्यांची अशी मानसिकता असते की ‘मार्केटिंगची काय गरज आहे?’ जर तुमचा विचारही असा असेल तर आधी ते विचार बाजूला काढा. संधीचा लाभ घेण्यासाठी आपल्या स्टोअरची योग्य प्रकारे मार्केटिंग करणे गरजेचे आहे. सोशल मीडिया, जाहिराती आणि अन्य मार्केटिंगच्या माध्यमांचा वापर करा, जेणेकरून अधिकाधिक लोकांना आपल्या स्टोअरबद्दल माहिती मिळेल.