फोटो सौजन्य: iStock
LinkedIn या जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल नेटवर्कने ‘स्किल्स ऑन द राइज 2025’ लिस्ट लाँच केली आहे, ज्यामधून १५ कौशल्ये निदर्शनास आली आहे, जी प्रोफेशनल्सनी कामाच्या ठिकाणी पुढे राहण्यासाठी आत्मसात करणे गरजेचे आहे. भारतातील कंपन्या हायरिंग करताना प्राधान्य देणारी अव्वल ५ झपाट्याने विकसित होणारी कौशल्ये म्हणजे सर्जनशीलता व नाविन्यता, कोड रिव्ह्यू , समस्या निवारण, प्री-स्क्रिनिंग आणि धोरणात्मक विचारसरणी.
भारतातील बहुतांश रोजगारांमध्ये वापरण्यात येणाऱ्या ६४ टक्के कौशल्यांमध्ये २०३० पर्यंत बदल होण्याची अपेक्षा असताना लिंक्डइन संशोधनामधून निदर्शनास येते की, २५ टक्के प्रोफेशनल्स भविष्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये नसल्याबाबत चिंता करतात. मुंबईतील १० पैकी जवळपास ४ (४५ टक्के) प्रोफेशनल्सना ते रोजगारासाठी योग्य असल्याचे निर्धारित करणे आव्हानात्मक जाते. 28 टक्के प्रोफेशनल्सना त्यांची कोणती कौशल्ये रोजगारासाठी अनुकूल आहेत, पूर्वीपेक्षा कोणत्या कौशल्यांना अधिक मागणी आहे हे माहित नाही. दुसरीकडे, भारतातील ६९ टक्के रिक्रूटर्स प्रोफेशनल्समध्ये असलेली कौशल्ये आणि कंपन्यांना आवश्यक असलेली कौशल्ये यामध्ये तफावत असल्याचे सांगतात.
21 मार्चला ‘या’ कंपन्यांच्या शेअर्समध्ये दिसून येईल तेजी, गुंतवणूक करण्यापूर्वी एकदा यादी पहा
आर्टस् अँड डिझाइन व मार्केटिंग यांसारख्या समकालीन सर्जनशील क्षेत्रांमध्ये, तसेच व्यवसाय विकास व शिक्षणामध्ये देखील सर्जनशीलता व नाविन्यता समस्या निवारण आणि धोरणात्मक विचारसरणी या कौशल्यांसाठी मागणी वाढत आहे. त्याचप्रमाणे, सेल्स व एचआर यांसारख्या कर्मचारी-केंद्रित पदांव्यतिरिक्त कम्युनिकेशन कौशल्य आवश्यक बनले आहे, ज्याला आयटी, कन्सल्टिंग आणि फायनान्समध्ये प्राधान्य दिले जात आहे.
मुंबईतील बहुतांश प्रोफेशनल्स २०२५ मध्ये नवीन रोजगारांचा शोध घेत आहेत. लिंक्डइनच्या नवीन संशोधनानुसार, मुंबईतील ८२ टक्के प्रोफेशनल्स या वर्षात नवीन रोजगाराचा शोध घेत आहेत. अशा लोकांसाठी पुढे काही महत्वाचे स्किल्स नमूद करण्यात आले आहे.
बिझनेस स्वीडनचा भारतात विस्तार; महाराष्ट्र हे व्यवसायासाठी सर्वोत्तम ठिकाण
1. सर्जनशीलता आणि नाविन्यता
2. कोड रिव्ह्यू
3. समस्या निवारण
4. प्री-स्क्रिनिंग
5. धोरणात्मक विचारसरणी
6. कम्युनिकेशन
7. अनुकूलला (जुळवून घेण्याची क्षमता)
8. लार्ज लँग्वेज मॉडेल्स (एलएलएएम)
9. एआय साक्षरता
10. डिबगिंग
11. ग्राहक सहभाग
12. सांख्यिकीय डेटा विश्लेषण
13. प्रॉम्प्ट इंजीनिअरिंग
14. मार्केट विश्लेषण
15. भागधारक व्यवस्थापन
1. इलेक्ट्रिकल डिझाइनर
2. ट्रॅव्हल एक्झिक्युटिव्ह
3. कॉन्फरन्स प्रॉड्युसर
4. हेड ऑफ इंटर्नल ऑडिट
5. कॉन्ट्रॅक्ट स्पेशालिस्ट
6. क्रिएटिव्ह स्ट्रॅटेजिस्ट
7. मेकॅनिकल इंजीनिअरिंग मॅनेजर
8. क्लोजिंग मॅनेजर
9. व्हिडिओग्राफर
10. गेस्ट रिलेशन्स मॅनेजर