(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस लिमिटेडने आपल्या पहिल्या समभाग विक्रीसाठी (आयपीओ) ₹२/- दर्शनी मूल्य असलेल्या प्रति इक्विटी शेअरचा किंमतपट्टा ₹५६०/- ते ₹५९०/- निश्चित केला आहे. कंपनीचा हा आयपीओ (IPO/ऑफर) सबस्क्रिप्शनसाठी बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी उघडेल आणि शुक्रवार, ३१ जुलै २०२६ रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान २५ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर २५ च्या पटीत बोली लावू शकतात. आजच्या प्रत्येकी इक्विटी शेअर्स ₹२ चे १,१७९,७५७,३२१ इक्विटी शेअर्स आऊटस्टॅडिंग (outstanding) आहेत.
या आयपीओमध्ये ₹८,००० कोटींपर्यंतचा नवीन इश्यू (Fresh Issue) आणि प्रवर्तक – ‘इम्पेरियस हेल्थकेअर इन्व्हेस्टमेंट्स पीटीई लिमिटेड’ (Imperius Healthcare Investments Pte. Ltd) आणि ‘मणिपाल एज्युकेशन अँड मेडिकल ग्रुप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ द्वारे २,१६,१३,८३४ इक्विटी शेअर्सची विक्री ऑफर (Offer for Sale) समाविष्ट आहे. भागविक्री करणाऱ्या इतर गुंतवणूकदारांमध्ये TPG SG Magazine Pte. Ltd, Seventy Second Investment Company LLC, Ammar Sdn Bhd, Novo Holdings Invest Asia A/S आणि Phoenix Bear Investments, LLC यांचा समावेश आहे.
काही थकबाकी कर्जांची व त्यावरील व्याजाची पूर्ण किंवा अंशतः परतफेड/पूर्वपेमेंट करण्यासाठी वापर केला जाईल, जे कर्ज कंपनीची प्रमुख उपकंपनी ‘मणिपाल हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेड’ हिने घेतले आहे. ₹५७४ कोटी हे कंपनीची स्टेप-डाऊन उपकंपनी ‘सह्याद्री हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेड’ मधील अल्पसंख्याक भागभांडवल (minority stake) अधिग्रहित करण्यासाठी वापरले जातील.
उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरली जाईल. कंपनी भारतामध्ये बहु-विशेषता (multispecialty) रुग्णालयांचे नेटवर्क चालवते. हे नेटवर्क बाह्यरुग्ण सेवांपासून (outpatient services) ते गुंतागुंतीच्या तृतीयक आणि चतुर्थांश (tertiary and quaternary) वैद्यकीय उपचारांपर्यंत सर्वसमावेशक आरोग्य सेवा प्रदान करते. ३१ मार्च २०२६ पर्यंत, कंपनी १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १३,०३७ परवानाकृत खाटांसह (licensed beds) ४९ रुग्णालये चालवत होती. ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या माहितीनुसार, भारतातील खाजगी रुग्णालय साखळीमध्ये रुग्णालयांच्या उपस्थितीच्या बाबतीत कंपनीचे नेटवर्क सर्वात मोठे आहे.
खाटांच्या क्षमतेनुसार ही भारतातील सर्वात मोठी पॅन-इंडिया मल्टीस्पेशालिटी रुग्णालय साखळी आहे आणि रुग्णालयांच्या संख्येनुसार दुसरी सर्वात मोठी रुग्णालय साखळी आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये, कंपनीने भारतातील खाजगी रुग्णालय साखळींमध्ये ₹१०३,३५७.५१ दशलक्ष (प्रो फॉर्मा आधारावर ₹१०९,३५६.१८ दशलक्ष) सह दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक महसूल नोंदवला. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा आणि पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड आणि सिक्कीम या तिच्या तीन प्रमुख प्रदेशांमध्ये ३१ मार्च २०२६ पर्यंत अनुक्रमे ६,४०४, २,१८८ आणि २,८८७ परवानाकृत खाटा होत्या.
भारतातील खाजगी रुग्णालय साखळींमध्ये, ३१ मार्च २०२६ पर्यंत कंपनी कर्नाटकात सर्वात मोठी, महाराष्ट्र व गोवा प्रदेशात सर्वात मोठी आणि पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड व सिक्कीम या निवडक राज्यांमध्ये सर्वात मोठी संस्था आहे (स्रोत: क्रिसिल रिपोर्ट). (परवानाकृत खाटा म्हणजे नियामक प्राधिकरणांनी मान्यता दिलेल्या रुग्णालयातील एकूण खाटांची संख्या).
३१ मार्च २०२६ पर्यंत बंगळुरू, कोलकाता आणि पुणे या तीन मेट्रो बाजारपेठांमध्ये खाटांच्या क्षमतेनुसार (५,३७६) आघाडीवर असलेली ही भारतातील एकमेव खाजगी रुग्णालय साखळी आहे (स्रोत: क्रिसिल रिपोर्ट).
३१ मार्च २०२६ पर्यंत बंगळुरू, कोलकाता आणि पुणे येथे अनुक्रमे: बंगळुरू: १२ रुग्णालये (२,५७९ खाटा), कोलकाता: ५ रुग्णालये (१,५१३ खाटा), पुणे: ९ रुग्णालये (१,२८४ खाटा) आहेत. आरोग्यसेवेची उपलब्धता सुधारण्याच्या मूळ तत्त्वज्ञानाला अनुसरून, कंपनी मेट्रो आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये संतुलित उपस्थिती ठेवते, ज्यामध्ये ३१ मार्च २०२६ पर्यंत तिच्या ४६.७८% परवानाकृत खाटा मेट्रो शहरांमध्ये आणि ५३.२२% परवानाकृत खाटा नॉन-मेट्रो शहरांमध्ये आहेत.
आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीने तिच्या नेटवर्कद्वारे ७६.३ लाख रुग्णांना सेवा दिली.
३१ मार्च २०२६ पर्यंत रुग्णालयांमध्ये ११,०६४ डॉक्टर उपलब्ध होते.
कंपनी कार्डियाक सायन्सेस, ऑन्कोलॉजी, न्यूरोसायन्सेस, गॅस्ट्रो सायन्सेस, ऑर्थोपेडिक्स आणि रीनल सायन्सेस (CONGO-R) मध्ये विशेष उपचार पुरवते.
कंपनीचा महसूल (Revenue from Operations): FY24 मधील ₹६,१७१.६ कोटींवरून FY26 मध्ये वाढून ₹१०,३३५.८ कोटी झाला.
निव्वळ नफा (Net Profit): FY24 मधील ₹५३३.२ कोटींवरून FY26 मध्ये वाढून ₹९१६.५ कोटी झाला.
बुक-रनिंग लीड मॅनेजर्स: कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड, गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जे.पी. मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, यूबीएस सिक्युरिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि डीबीएस बँक इंडिया लिमिटेड आहेत. तर रजिस्ट्रार: केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (KFin Technologies Limited)आहेत.
हे शेअर्स BSE आणि NSE वर सूचीबद्ध (listed) करण्याचे प्रस्तावित आहे.






